सूपरमार्केटमधली गारगार एसीची हावा खात खरेदी करण्याचे सुख ग्राहकांसाठी दुसरं कोणतं नसेल. अशा मस्त ठिकाणी हातात ट्रॉली घेऊन सामान खरेदी करताना तुम्हाला १२ फूटांचा अजगर दिसला तर?
तसं परदेशातल्या सुपरमार्केटबद्दल विचारायलाच नको, तिथे टापटिपपणा आणि स्वच्छतेला इतकं प्राधान्य असतं की उंदीर, झुरळ तर सोडाच पण साधी मुंगीही दिसायची नाही. तेव्हा अशा सुपर मार्केटमध्ये अजगर कसा दिसणार बरा? पण केपटाऊन मधल्या एका सुपरमार्केटमध्ये ग्राहकाला फ्रिजमध्ये चक्क १२ फूटांचा अजगर दिसला. फ्रिजमधलं दही घेण्यासाठी एका ग्राहकाने फ्रिज खोलला असता आतमध्ये अजगर निवांत बसलेला त्या ग्राहकाला दिसला. त्याला पाहून त्याने आरडाओरडा केला. अर्थात नंतर सर्पमित्रांना बोलावून या सापाला सुपरमार्केटमधून थेट जंगलात सोडण्यात आलं. आता एवढा मोठा अजगर सूपरमार्केटमध्ये शिरला कसा? आणि त्यातूनही तो फ्रिजमध्ये गेला कसा? या विचाराने दुकानाचा मालकही चक्रावून गेला आहे.
Viral Video : विषारी सापासोबत सेल्फी काढण्याच्या नादात जीव गेला
Viral Video : आशियायी वंशाच्या प्रवाशाला विमानातून फरफटत काढले बाहेर