Python Rescued Video : Python Rescued Video : साप, अजगर पाहताच भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यात सापापेक्षा अजगर जगातील सर्वांत प्राणघातक सरपटणारा प्राणी मानला जातो. हा प्राणी कुठेही जाऊन राहू शकत असल्यामुळे माणसाला त्यापासून अधिक धोका असतो. तसेच नकळत ते आपल्या घराला त्यांचे घर कधी बनवतील काही सांगता येत नाही. महाकाय अजगर आपल्या वेटोळ्यात गुंडाळून माणसाचा जीव घेतो. त्यामुळे अनेकांच्या मनात या प्राण्याविषयी फार भीती आहे. सध्या सोशल मीडियावर अजगरांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.

पाण्याच्या टाकीत एकाच वेळी २अजगर अन् एक विषारी साप

अजगराचा हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील इटावामधील एका गावात आहे. तिथे एका सरकारी कूपनलिकेच्या पाण्याच्या टाकीतून एकाच वेळी तब्बल २४ अजगर व एक साप बाहेर काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. इतके अजगर एकाच वेळी पाहून गावकरीदेखील हैराण झाले. त्यामुळे या घटनेनंतर आता गावकरी शेतात जाण्यासही घाबरत आहेत.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
The rambunctious bull came straight out of the ring
खतरनाक! उधळलेला बैल थेट कूंपण तोडून बाहेर आला… पुढच्या पाच सेकंदात जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

दरम्यान, या घटनेची वेळीच वन विभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली. त्यांनी शिताफीने त्या २४ अजगर व एका विषारी सापाची सुटका करून, त्यांना सुरक्षित स्थळी सोडले. पाण्याची टाकी खोल असल्यामुळे पथकाला बचावकार्यात खूप अडचणी आल्या. इतके २४ अजगर आणि एका सापाला एकाच वेळी पाहून अन् मग त्यांना बाहेर काढताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटला.

पाण्याच्या टाकीतून २४ अजगरांची सुटका

हे संपूर्ण प्रकरण इटावा तहसील चाकरनगर भागातील पाली गोपालपूर गावातील आहे. या ठिकाणी कूपनलिका असलेल्या पाण्याच्या टाकीत दोन डझन अजगर आणि एक साप होता. ते दृश्य पाहून ग्रामस्थ हादरले. भीतीमुळे ते आपल्या शेतातही जात नव्हते. दरम्यान, ग्रामस्थांच्या माहितीवरून वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्याच्या टाकीतून २५ सापांची सुटका केली. त्यांच्यामध्ये एक अत्यंत विषारी क्रेट सापही आढळून आला.

चंबळ अभयारण्य परिसरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अजगर व सापाची सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या पकडलेल्या सर्व अजगरांना वन विभागाच्या सुटका पथकाने चंबळ अभयारण्यात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

Read More Trending News : घरातून येऊ लागला भयानक आवाज; कोपऱ्यातील बॅग उचलताच दिसले असे काही की…; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

दरम्यान, बचावकार्य करणारे वन्यजीव तज्ज्ञ डॉ. आशीष त्रिपाठी यांनी सांगितले की, पाण्याची टाकी सुमारे १० फूट खोल होती. तेथून अजगरांना बाहेर काढणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. मात्र, मोठ्या काळजीने एकेक करून सर्व अजगर बाहेर काढण्यात आले आहेत. पाण्याच्या टाकीतून २४ अजगर आणि एक विषारी क्रेट साप बाहेर काढण्यात आला आहे. अजगर इतके धोकादायक नसतात; परंतु क्रेट साप अतिशय विषारी असतो. त्याच्या दंशाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो.