Python Shocking Video : जगभरात साप, अजगराच्या विविध प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती विषारी म्हणून तर काही महाकाय शरीरामुळे ओळखल्या जातात. पण साप, अजगर कोणत्याही प्रजातीचा का असेना माणसाला त्याची भीतीच वाटते. कारण सापाचा एक दंश तसेच अजगराचा एक विळखा माणसाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतो, हे आपण डोक्यात फिट केलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रजातीचा साप, अजगर असला तरी लोक त्यापासून अंतर ठेवून राहतात. सध्या सोशल मीडियावर एका महाकाय अजगराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यातील अजगराची लांबी पाहून भल्याभल्यांना घाम फुटला आहे. विशेष म्हणजे हा महाकाय अजगर उभा राहून चक्क एका झाडावर चढला. हा अजगर २५ फूट लांब आणि ४५ इंच जाड असल्याचे सांगण्यात येत आहे.
अजगराचा भयावह व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महाकाय अजगर १० फूट उंच पेरूच्या झाडावर चढताना दिसत आहे. पण, हा भयंकर अजगर ज्या प्रकारे माणसाच्या उंचीइतका उभा राहतो आणि झाडाची फांदी पकडतो, ते दृश्य पाहताना फारच भयावह वाटते. या दृश्याने तेथे उपस्थित ग्रामस्थांनाही आश्चर्य वाटले.
तुम्ही आत्तापर्यंत जमिनीवर रेंगाळणारे साप, अजगर कधी-कधी फणा काढून काही उंचीपर्यंत उभे राहताना पाहिले असतील, पण जड आणि महाकाय शरीर असलेल्या अजगराने असं करणं फार अवघड वाटते. पण, व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असेच दृश्य पाहायला मिळाले आहे. जिथे एक महाकाय अजगर झाडाच्या उंचीइतके आपले शरीर वर करतो आणि उभा राहतो. यानंतर हळू हळू तो झाडावर चढू लागतो. झाडावर चढताच तो आणखी वर वर जाण्याचा प्रयत्न करतो. झाडाची उंची सुमारे १०-१२ फूट असेल. याच झाडावर उभा राहून चक्क महाकाय अजगर चढत आहे.
अजगर झाडावर चढत असताना त्याचे बाकीचे महाकाय शरीर झाडाच्या खाली लटकताना दिसतेय. हे दृश्य पाहून लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
अजगराचा हा भयावह व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या एक्स हँडल @susantanda3 वरून शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “भारतातील जंगलात आणखी एक दिवस, एक साप इतका प्रचंड मोठा अजगर दिसला, इतका मोठा की त्याच्या नावावर एक रेकॉर्ड दाखल झाला आहे.”
अजगराचा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहून त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हायरल व्हिडीओ कुठला आहे असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. ज्याच्या उत्तरात दुसऱ्या युजरने हा व्हिडीओ पूर्व उत्तर प्रदेशचा असल्याचे सांगितले. तर अनेकांनी या व्हिडीओला AI मेड असे वर्णन केले आहे.