Python Swallows A Whole Deer: अजगराला पाहून प्रत्येकाचा थरकाप उडतो. अजगर प्राण्यांना किंवा माणसालाही गिळू शकतो. यासंबंधित व्हिडिओदेखील अनेक वेळा व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका भयानक अजगराने संपूर्ण हरीण काही क्षणात गिळले आहे. हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. काही क्षणात अजगराने हरीण ज्याप्रकारे गिळले ते पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओ शेअर करणाऱ्या इन्स्टाग्राम हँडलमध्ये या व्हिडीओची तारीख किंवा ठिकाण नमूद केलेले नाही. अनेक वापरकर्त्यांनी असे सांगितले आहे की, हा बर्मीज अजगर आहे(Burmese python) जो पृथ्वीवरील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे. काहींनी असे देखील म्हटले आहे की, अजगर इतक्या लवकर कधीही खात नाहीत. मात्र हा अजगर ज्या प्रकारे भक्ष्य गिळत आहे ते भयानक आहे.

( हे ही वाचा: Viral Video: मॅडमच्या शेजारी उभा राहून बोलत होता कविता अन् तितक्यात निसटली पँट; आणि मग…)

येथे व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: ‘झोमॅटो’ रिव्ह्यूमध्ये फूड पॉइजनिंगची तक्रार! ग्राहक आजारी पडल्याची पोस्ट Zomato नं हटवली अन्….)

हा व्हिडीओ beautiful_new_pix हा आयडीवरून शेअर करण्यात आला असून, यामध्ये एक माणूस अजगर हरीण गिळत असताना त्याला थोपटताना दाखवण्यात आला आहे. व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला असंख्य व्ह्यूज मिळाले असून अनेकजण यावर भरपूर कंमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “मला सापांचा तिरस्कार आहे,” दुसरा म्हणाला “हे उलट आहे, ते इतक्या वेगाने खात नाहीत. तुम्ही त्या अजगराला थोपटताना पाहू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Python swallows a whole deer within seconds shocking video viral on social media gps