Deer And Python Viral Video: वन्यप्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. त्यांची शिकार करण्याची पद्धत आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. जीवनचक्र चालू राहण्यासाठी प्रत्येक प्राणी एकमेकांवर अवलंबून आहे. इथे कोण, कधी अन् कसा विजयी होईल, हे कोणालाच माहीत नाही. प्रत्येक प्राण्याची स्वतःची शैली असते. आता अजगराकडेच बघा, तो इतर सापांसारखा दंश करीत नाही, तर आपली शिकार थेट गिळतो. अजगर आधी भक्ष्य पकडतो आणि नंतर तो ते गिळतो. शिकार मोठी असली तरी ती अजगर आपल्या पोटात आरामात सरकवतो. अजगर हा सगळ्यात मोठा साप इतर सापांप्रमाणे विषारी नसला तरी तो सर्वांत घातक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कारण- तो मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करतो.
सर्वसाधारणपणे अजगर सात ते आठ फूट लांब असतात. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे व्हायरलदेखील होतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; जो खूपच धक्कादायक आहे. त्यामध्ये एक हरीण अजगराच्या तावडीत सापडल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध अजगरानं एका हरणाला असा काही विळखा घातला आहे की, तो त्यामधून सुटूच शकत नाही. निर्जन रस्त्यावर एक हरीण फिरत असताना, या अजगरानं त्याला लक्ष्य केलं आणि आपलं भक्ष्य बनविण्याच्या विचारानं त्याला घेरलंदेखील. अजगर विषारी नसला तरीही त्याचा अवाढव्य आकार आणि प्राणी गिळण्याची सवय यांमुळे त्याची भीती वाटते. असं म्हणतात की, अजगराच्या विळख्यात सापडलेल्या प्राण्याची सुटका करणं फार कठीण काम असतं. मात्र, एकानं हे शक्य करून दाखवलं आहे. त्यानं अजगराच्या तावडीतून हरणाची सुटका केली आहे. हरणाची अजगराच्या तावडीतून कशी सुटका झाली ते जाणून घेऊ…
(हे ही वाचा : चिमुकल्या बहिणीचे शाळेचे शूज रस्त्यावरील साठलेल्या पाण्यात भिजू नयेत म्हणून भावानं केलं असं काही की…पाहून कौतुक कराल )
अजगरानं हरणाला विळखा घातला होता. ते पाहताच अचानक एकानं हरणाला वाचविण्यासाठी झाडाच्या फांदीनं अजगरावर हल्ला करायला सुरुवात केली. अखेर घाबरून अजगर हरणाला मागे सोडून पळून जातो. मग हरणही कसातरी जीव वाचवून तिथून पळून जाण्यात यशस्वी होतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ X च्या हँडल @AMAZlNGNATURE वरून शेअर करण्यात आला आहे. हा जुना व्हिडीओ असला तरी तो इतका व्हायरल होत आहे की, ५७ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “निसर्गाच्या सान्निध्यात कधीही येऊ नये. हे एक नाजूक संतुलन आहे; ज्यामध्ये छेडछाड केली जाऊ शकत नाही.” दुसऱ्या युजरनं लिहिलं, “हे खूप गुंतागुंतीचं आहे. आता अजगराला उपाशीच राहावं लागेल” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.