अजगर हा जगातील असा प्राणी आहे, जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो. जर कुणी अजगराच्या तावडीत सापडलं तर त्याची सूटका होणे सगळ्यात अवघड असतं. कधी कधी तर ते सिंहालाही गिळून टाकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ एक माकड आणि अजगराचा आहे. या व्हिडीओमध्ये माकड अजगराच्या तावडीत सापडलेला दिसत आहे. त्यानंतर 

बघता बघता तिथे माकडांचा अख्खा कळप जमला. या व्हिडीओचा शेवट पाहण्यासारखा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका माकडाला अजगराने कसं पकडलं आणि त्याला कशा पद्धतीने फस्त केलं. आपली शिकार कशीही करून गिळण्याची क्षमता अजगरामध्ये असते. या व्हिडीओमध्येही तो तसाच प्रयत्न करत आहे. अजगराने या माकडाला पूर्णपणे गुंडाळून ठेवलं होतं. हे पाहून तिथले आजूबाजूचे सारेच माकड जमा होऊ लागले. आपल्यातल्या एका माकडाला अजगराने पकडून ठेवलंय हे पाहून एक एक करत माकडसेना त्याच्या मदतीला पुढे येताना दिसून येत आहेत. कुणी माकडाची शेपूट ओढून तर कुणी त्याचे हात ओढत अजगराच्या तावडीतून सोडण्याचा प्रयत्न करू लागतात. माकडाच्या बचावासाठी आलेली माकडसेना पाहून अजगरही त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण ही माकडसेना हूशारीने माकडाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. 

आणखी वाचा : मिशिगन लेकमधील ढगांचा जुना VIDEO VIRAL, निसर्गाचा असा चमत्कार पाहून व्हाल हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चक्क वाघाची शेपूट पकडून त्याच्या बरोबरीने चालू लागला, पाहा हा VIRAL VIDEO

wildmaofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या व्हिडीओमधून एकतेचा संदेश दिला. तर काहींनी जे माणसाला नाही जमत ते या माकडांनी करून दाखवलं असल्याचं म्हटलंय. 

Story img Loader