Python Attack Crow Video : अजगराला फक्त मनुष्यच नाही तर प्राणीदेखील खूप घाबरतात. अजगराला पाहून भल्याभल्यांची पळता भुई थोडी होते. कारण हा सरपटणारा प्राणी कधी कोणावर हल्ला करेल आणि क्षणात जीव घेईल काही सांगता येत नाही, त्यामुळे प्राण्यांसह माणूसही या प्राण्यापासून सावध राहतो. एकदा का शिकारी अजगराच्या विळख्यात अडकला तर त्याच्या तावडीतून सुटणं शक्य नाही. सध्या सोशल मीडियावर अजगराचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अजगराला आजवर जमिनीवर सरपटताना शिकार करताना पाहिले असेल पण हवेत शिकार केल्याचं कधी पाहिलं आहे का? नसेल तर या व्हिडीओत अजगर चक्क हवेत शिकार करतानाचा थरार तुम्हाला पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजगराने कावळ्याचं डोकं जबड्यात पकडलं अन्…

व्हिडीओमध्ये खांबाला लटकलेला एक अजगर कावळ्याला आपली शिकार बनवताना दिसत आहे. यावेळी बिचारा कावळा जीव वाचवण्यासाठी तळमळत राहिला, पण अजगराने त्याला काही सोडले नाही, त्याने कावळ्याचं डोकं आपल्या जबड्यात पकडले आणि त्याला घट्ट विळखा घालतला, यानंतर हवेतच कावळ्याला आपल्याकडे खेचत राहिला. अशाप्रकारे त्याने कावळ्याचा गुदमरून जीव घेतला. हा व्हिडीओ खरंच काळजात धडकी भरवणारा आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका विजेच्या थांबावर लटकलेला अजगर कावळ्यावर हल्ला करतो. भीषण म्हणजे अजगर कावळ्यावर हल्ला करत त्याचं डोकं आपल्या जबड्यात पकडतो आणि त्याला वर खेचतो. अजगर जसजसा कावळ्याला वर खेचतो तसतसा तो त्याच्या शरीराभोवती विळखा घालतो. अजगर हवेतच कावळ्याच्या शरीराभोवती विळखा घालत असल्याचे दिसतेय. अशाप्रकारे अजगर कावळ्याला शेपटीपर्यंत गुंडाळतो आणि वर घेऊन जातो. जेणेकरुन कावळ्याच्या शरीरातील सर्व हाडे तोडून ते त्याचे अन्न बनवू शकेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – भयंकर! हातातून मोबाईल हिसकावल्याचा राग, लहान मुलाने आईच्या डोक्यात घातली बॅट; थरारक घटनेचा Video Viral

हा व्हिडीओ @TheBrutalNature नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मॉर्निंग वाइब्स”, अजगराला अशाप्रकारे कावळ्याची शिकार करताना पाहून युजर्सही शॉक झाले आहेत. एका युजरने लिहिले की, हे खूप धोकादायक आणि भीतीदायक आहे. दुसऱ्याने लिहिले की, अजगराने कावळ्याला ज्या प्रकारे पकडले, ते पाहून कोणीही घाबरेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Python viral video python hanging from pole caught the crow in the air held it tightly and lifted it up scary video will shock you sjr