Python Viral Video : अजगराचे नाव घेतले तरी भल्याभल्यांना घाम फुटतो, अशा अजगराच्या पुढ्यात तुम्ही कधी आलात तर त्यावेळी तुमची काय अवस्था होईल, याचा विचार करूनही तुम्हाला भीती वाटली असेल; कारण अजगर हा अतिशय धोकादायक असा सरपटणारा प्राणी आहे. सहसा तो शिकार करताना दिसत नाही, पण एकदा का त्याने ठरवले तर अख्खा जिवंत माणूस तो गिळून टाकतो, इतकी ताकद त्याच्यात आहे; त्यामुळे अजगराच्या विळख्यात एकदा कोणी फसला तर त्याची सुटका होणे फार अशक्य असते. मात्र, सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होईल.

चिमुकल्या अजगराच्या पाठीवर बसल्या अन्…

हो, कारण ज्या अजगराला पाहून अनेकांना घाम फुटतो, अशा भल्यामोठ्या अजगराच्या पाठीवर बसून दोन चिमुकल्या बिनधास्तपणे खेळताना दिसत आहेत. त्या इवल्याशा मुलींना अजगराची किंचितही भीती वाटतं नाही. त्या अगदी आरामात सरपटणाऱ्या अजगराच्या पाठीवर बसून पुढे जात आहेत. काही सेकंदासाठी तर असं वाटतं की, अजगर जर चिडला तर काय होईल. पण, अजगर कसलाही आक्रमकपणा न दाखवता सरपटत पुढे जातोय आणि चिमुकल्या त्यावर मस्त आरामात बसून खेळतायत.

खरं तर अनेक लहान मुलं एखाद्या प्राण्याला पाहताच रडू लागतात. पण, या व्हिडीओतील चिमुकल्यांनी मात्र अजगराला खेळणं बनवलं असून त्या त्याच्याशी खेळताना दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ कुठला आणि कधी शूट केलेला आहे, याची माहिती मिळू शकली नाही, पण हा धडकी भरवणार व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

काळजात धडकी भरवणार व्हिडीओ

Read More Trending News : मगरीने महाकाय अजगराला जबड्यात पकडून गरगर फिरवले अन्…, पुढे जे घडलं ते फार भयानक; पाहा धडकी भरवणारा Video

हा व्हिडीओ @BapuDaLadla नावाच्या अकाउंटसह शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, ‘हा अजगर आता मी कुठे अडकलोय असा विचार करत असेल यार.’ आत्तापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले आहे की, ‘या कशा मुली आहेत यार, त्यांना भीती वैगरे वाटत नाही का?’ आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘बिचारा अजगर, या मुलींमध्ये जाऊन फसला.’ तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘गजब आहे यार.’ आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘या मुली अजिबात घाबरत नाहीत बघून आश्चर्यकारकच वाटतयं.’