Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. : साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो.सध्या असाच एक जंगलातला व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका अजगराचा थरारा व्हिडीओतून समोर आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक अजगर झाडाला धरून लटकताना दिसत आहे. त्यानं केलेल्या शिकारसह झाडावर तो उलटा लटकला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अजगर १२ तास झाडाला लटकत राहिला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> फोटो काढण्यासाठी पालकांनी मुलांना जिवंत मगरीसमोर उभं केलं; पुढच्याच क्षणी जे झालं….VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करुन मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Python was seen hanging with a hunter for 12 hours watch the thrilling scene video viral srk