इंडिगोच्या इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये एका हवाईसुंदरीसोबत प्रवाशाने वादविवाद केल्याच्या व्हिडीओ तुफान व्यायरल झाला होता. विमानात दिल्या जाणाऱ्या जेवणावरून प्रवासी आणि हवाई सुंदरी यांच्यात खटके उडाल्याची माहिती समोर आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कतार ऐअरवेजने लठ्ठपणामुळं ब्राझिलच्या एका मॉडेलला विमान प्रवास करण्यापासून रोखलं. जुलियाना नेहमे असं या महिलेचं नावं आहे. गेल्या महिन्यात २२ नोव्हेंबरला बिरूत ते डोहा असा विमान प्रवास या महिलेला करायचा होता. मात्र महिलेच्या लठ्ठपणामुळं कतार ऐअरवेजने तिला प्रवास करु दिला नाही. सोशल मीडिया इनफ्लूयन्सर जुलियानाने या धक्कादायक प्रकाराबाबत इन्साग्रामवर पोस्ट शेअर केली. या प्रकरणाबाबत ब्राझीलच्या न्यायाधीशांनी कतार ऐअरवेजला सुनावलं आहे. महिलेच् सायकोथेरापीच्या सेशन्ससाठी कतार ऐअरवेजने पैसे द्यावेत, असे आदेशही दिले आहेत.
नेमकं काय घडलं?
जुलियानाने या प्रकरणाबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं, ” मी इकॉनॉमी सीटसाठी दिलेल्या $947 पैशांचा परतावा देण्यासही मला नकार देण्यात आला. तसंच मोठ्या सीटवर बसण्यासाठी फर्स्ट क्लास तिकिटसाठी $3,000 एवढे पैसे द्यावे लागतील, असंही मला सांगण्यात आलं.” झालेला सर्व प्रकार जुलियानाने इन्साग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे. यावेळी जुलियाना व्हिडीओत बोलताना म्हणाली, “माझा प्रवास करण्याचा अधिकार असतानाही त्यांनी मला नाकारलं. मदत..! मी लठ्ठ असल्यामुळे ते मला प्रवास करु देत नाहीत. घडलेला प्रकार खूप भयानक आहे. कतारसारखी कंपनी माणसांमध्ये भेदभाव करते, हे लज्जास्पद आहे. मी लठ्ठ आहे, पण मी इतरांसारखीच आहे.”
इथे पाहा व्हिडीओ
हॉटेलमधील कर्मचारी, विमानात ड्यूटी करणाऱ्या हवाईसुंदरी प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तप्तर असतात. पण ही सुद्धा माणसं असतात, या विसर अनेकदा काही श्रीमंत माणसांना होत असतो. ही माणसं आपल्या सेवेसाठी जरी कर्तव्यदक्ष असली, तरी ते आपले नोकर नाहीत आणि जरी नोकर असले तरी त्यांच्यावर आरडाओरडा करण्याचा आपल्याला कोणताच हक्का नाही. अशाच गडगंज श्रीमंतीच्या अहंकाराला विमानातील हवाईसुंदरीने चांगलाच धडा शिकवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला होता. इंडिगोच्या इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये एका प्रवाशाच्या उद्दामपणाने वैतागलेल्या हवाईसुंदरीने कठोर शब्दात त्याला समज दिली होती. ही घटना ताजी असतानाच आता ब्राझिलच्या मॉडेलला लठ्ठपणामुळं कतार ऐअरवेजने विमान प्रवास नाकारल्याचा धक्कदायक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.