ज्यांना आकाशात मुक्त विहार करायची सवय असते अशा पाखरांना हातभर पिंज-यात वर्षानूवर्षे डांबून ठेवले तर कसे वाटेल? हा विचार आपल्या मनात कधीच येतच नाही. आपल्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणत असेल तर आपण पेटून उठतो मग या मुक्या जीवांवर झालेल्या अन्यायाबद्दल कोण बोलणार? हा साधा प्रश्न कितीतरी दिवस तिच्या मनात थैमान घालत होता. मनाशी काहीतरी ठरवून तिने चक्क पक्षी संग्रहालच विकत घेतले. तिथल्या पिंज-यातल्या सा-या पक्ष्यांना दोन मोठ्या ट्रकमध्ये ठेवले, त्यांना मोकळ्या जागी आणले आणि मुक्त केले पुन्हा तिच झेप घेण्यासाठी.
वाचा : सिक्रेट सांता बनून बिल गेट्सने ‘त्या’ महिलेला पाठवल्या भेटवस्तू
ऑस्ट्रीयामधला हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. असे म्हटले जाते की कतारमधल्या एका श्रीमंत पक्षीप्रेमी तरूणीने पक्ष्यांना मुक्त करण्यासाठी पूर्ण संग्रहालयच विकत घेतले. याचा व्हिडिओही फेसबुकवर टाकण्यात आला असून आतापर्यंत ९० लाखांहूनही अधिक लोकांनी तो पाहिला आहे. हजारो पक्ष्यांना एका ट्रकमध्ये भरून उंच माळरानावर आणण्यात आले. पिंज-याचे दार उघडताच वर्षानुवर्षे कोंडून ठेवलेल्या या पक्ष्यांनी आकाशात उंच भरारी घेतली. ‘अमेझिंग थिंग्स इन द वर्ल्ड’ या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. कतारमधल्या या श्रीमंत मुलीजवळ पैसे होते पण या पैशाने तिने या सा-या पक्ष्यांचे स्वातंत्र्य विकत घेतले आणि पुन्हा नवा श्वास घेण्यासाठी या सा-यांना मुक्त केले.
वाचा : येथे होते ख्रिसमस ट्रीची शेती