Queen Elizabeth II Death: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. स्कॉटलँडमध्ये गुरुवारी ८ सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ काळापासून त्यांची प्रकृती खराब होती मात्र अखेरीस काल त्यांची प्राणज्योत मालवली. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर जगभरातून राजकीय नेते, कलाकार अशा अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. पण प्रत्यक्ष निसर्गाने सुद्धा लाडक्या राणीला अलविदा करण्यासाठी एक खास योग जुळवून आणला होता अशी चर्चा ऑनलाईन सुरु आहे. याचे काही खास फोटो व व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Queen Elizabeth II यांचा मुकुट लग्नातच तुटला आणि..एलिझाबेथ द्वितीय यांच्या आयुष्यातील खास क्षण पाहा

गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस पडल्यानंतर ढग दूर झाल्याने ही दुर्मिळ घटना आकाशात दिसली. वेस्टमिन्स्टरमधील एलिझाबेथ टॉवर आणि क्वीन व्हिक्टोरिया मेमोरियलसह राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणी दुहेरी इंद्रधनुष्य दिसत होते. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनांनंतर बँकिंघम पॅलेसबाहेर जमलेल्या नागरिकांनी साश्रूडोळ्यांनी राणीला निरोप दिला.

दरम्यान, महाराणी यांचे पार्थिव एडिनबर्ग येथील वेवरली स्थानकातील एका शाही रेल्वेमध्ये ठेवण्यात येणार आहे. या रेल्वेतूनच लंडनच्या दिशेने महाराणी शेवटचा प्रवास करणार आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारांसाठी ऑपरेशन युनिकोर्नची सुरुवात करण्यात आली आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे राजा झाले आहेत तर चार्ल्स यांची दुसरी पत्नी, कॅमिला या क्वीन कॉन्सोर्ट म्हणून ओळखल्या जातील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queen elizabeth ii death farewell rare double rainbow seen over buckingham palace watch video svs
Show comments