अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जो नेटिझन्सनी हजारो वेळा पाहिला आहे. हा व्हिडीओ एका लाजिरवाण्या कृत्याचा आहे. या व्हिडीओमध्ये राणीचे दोन रॉयल गार्ड्स मार्च काढताना दिसून येत आहेत. हे दोन्ही रॉयल गार्ड्स अगदी ऐटीत सरळ दिशेने जात असतात. पण नेमकं याच वेळी एक घटना घडली आहे, ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. होय, याचा कारणही तसंच आहे. तुम्हीच प्रत्यक्ष पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, निळे-राखाडी कोट परिधान केलेले, अस्वलाच्या कातडीच्या टोप्या आणि हाताने खांद्यावर रायफल ठेवलेले दोन रॉयल गार्ड्स दिसून येत आहेत. काही मोजक्या लोकांची गर्दी असलेल्या ठिकाणी हे दोन्ही रॉयल गार्ड्स एकत्र कूच करताना दिसून येत आहेत. हे दोघे रॉयल गार्ड्स रूट मार्च करताना मध्येच त्यांच्या मार्गात एक लहान चिमुकला मुलगा आलेला दिसून येत आहे. समोर एक लहान मुलगा खेळत असल्याचं पाहून यातल्या एका गार्डने जोरात ओरडत त्याला इशारा देखील दिला होता. परंतू खेळण्याच्या नादात असलेल्या या मुलाला अचानक काय करावे, हेच सुचेनासं झालं. काय करावे हे कळण्याच्या आताच हे दोन्ही गार्ड्स त्याच्याजवळ पोहोचले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या मेट्रो ट्रेनमध्ये तरुणांनी गायलं AR Rahman चं गाणं, गोड आवाजावर नेटकरी फिदा, व्हिडीओ पाहाच

आपल्या मार्गात आलेल्या लहान मुलाला पाहून हे दोन्ही रॉयल गार्ड्स थांबतील की त्याला धक्का देऊन पुढे जातील असा प्रश्न मनात येऊ लागतो. पण तितक्यात यापैकी काहीही न करता गार्ड या लहान मुलाला पायाखाली तुडवत पुढे गेला. हे लाजिरवाणं कृत्य पाहून प्रत्येक जण या व्हिडीओवर आपला रोष व्यक्त करत आहेत. मुलाला पायदळी तुडवल्यानंतर हा गार्ड मागे वळून सुद्धा पाहत नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : रस्त्यावरून चालता चालता अचानक वीज अंगावर पडली, चारही बाजुने आगीच्या ठिणग्या उडाल्या अन् क्षणात झाला चमत्कार

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! करोना लस पाहताच ‘तो’ घाबरला अन् मोठमोठ्यानं रडायला लागला, मग जे झालं ते पाहून पोट धरून हसाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असल्याने लोक त्यावर कमेंट करत आहेत. दोन वेगवेगळ्या विचारांची लोक या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसून येत आहेत. काही लोकांच्या गटाने गार्ड्सच्या या कृत्यावर टीका केली आहे आणि दुसऱ्या लोकांचा गटाने गार्डची बाजू घेतली आहे. “या लहान मुलांच्या आईने त्याला सांगायला हवं होतं. लहान मुलगा त्यांच्या मार्गात आला, शेवटी ते त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कसं काय थांबवू शकतात.”, असं कमेंटमध्ये म्हटलंय.

यात शंका नाही की आजच्या युगात जिथे सर्व काही व्हायरल होतं आणि तेही वणव्यासारखं… हा व्हिडीओही सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. जर या व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर तो १.६ मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका नेटिझन्सने तर असंही लिहिलं की “राणीच्या रक्षकासाठी मार्ग काढणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे”. मात्र या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सध्ये राग व्यक्त करणारे कमेंट्स शेअर करण्यास सुरूवात केली आहे.

Story img Loader