Raat Bathing in Rain Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. प्राण्यांच्या विचित्र हरकती नेटकऱ्यांना व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला आवडतात. जंगली आणि पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओ वेगाने व्हायरल होतात. असाच एक मूड फ्रेश करणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर पाहायला मिळत आहे. तुम्हीही कधीतरी पहिल्या पावसात भिजला असाल, अंघोळ केली असेल पण कधी उंदीर मामाला पावसात अंघोळ करताना पाहिलंय का? नाही ना. मग हा व्हायरल व्हिडीओ पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पावसात आंघोळ करताना उंदीर तुम्ही क्वचितच पाहिला असेल. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक उंदीर पावसाचा मनसोक्त आनंद घेत असून अंग घासून आंघोळ करत असल्याचे दिसत आहे. कधी तो चेहरा तर कधी अंग घासताना दिसत आहे. तो माणसांप्रमाणेच उभा राहून आंघोळ करत आहे. उंदराची आंघोळीची स्टाईल इतकी गोंडस आहे की ते पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे. हा व्हिडीओ पाहून लक्षात येत की, पाऊस फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही आवडतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ रुळात अडकला कुत्र्याचा पाय; समोरुन आली ट्रेन अन् कर्मचाऱ्यांमुळे…
हा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.हा व्हिडिओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काही युजर्सनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘प्राणी खूप स्वच्छ असतात.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘या उंदराला स्वच्छता आवडते.