आजपर्यंत तुम्ही ससा आणि कासव यांच्यात रंगलेल्या शर्यतीच्या गोष्टी ऐकल्या असतील. या ससा आणि कासवाच्या शर्यतीच्या गोष्टीतून आपण आतापर्यंत आयुष्याचे धडे घेतले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला सशाच्या अशा शर्यतीबाबत सांगणार आहोत जी जिंकण्यासाठी नव्हे तर स्वतःता जीव वाचवण्यासाठी होती. सशाच्या शर्यातीतून आतापर्यंत आयुष्याचे धडे आपण गिरवले असतील, पण या शर्यतीच्या व्हिडीओमधून सशानं जीवाची बाजी मारलीय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर सशाची ट्रेनसोबत असलेल्या शर्यतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हा गोंडस छोटासा ससा रेल्वे रुळावर धावताना दिसून येतोय. हा छोटुकला ससा ट्रेनखाली येऊन चिरडला जाणार असं काही वेळासाठी वाटू लागतं. पण पुढे जे होतं, ते पाहून सुटकेचा श्वास घेतो. हा ससा आपला जीव वाचवण्यासाठी धावतोय, हे जेव्हा ट्रेन चालकाच्या लक्षात आलं तेव्हा त्याने आपल्या ट्रेनचा वेग कमी केला. यानंतर, तो ट्रेनचा हॉर्न वाजवून सशाला सावध करण्याचा प्रयत्न करतो. ससा ट्रेनच्या रुळावर धावत राहतो आणि शेवटी आपला जीव वाचवण्यात यशस्वी होतो.
आणखी वाचा : तुम्ही कधी चार कान असलेली मांजर पाहिलीय का? VIRAL VIDEO पाहून तुम्ही हैराण व्हाल !
आणखी वाचा : Dancing Dadi : ‘लॉलीपॉप लागेलू…’, आजीही स्वतःला आवरू शकली नाही; पाहा VIRAL VIDEO
सर्वांना आश्चर्य करून सोडणारा हा व्हिडीओ फेसबुकवर ‘व्हायरल हॉग’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत सुमारे १० लाख लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट्सही करत आहेत. काही युजर्सनी ट्रेनच्या ड्रायव्हरचं कौतुक सुद्धा केलंय. एकाने युजरने कमेंट करत लिहिलं की, “ट्रेन चालक त्या सशाला सहज पायदळी तुडवून पुढे जाऊ शकला असता, परंतु त्याने ट्रेनचा वेग कमी करण्याचा पर्याय निवडलाच, पण तो ससा बाहेर पडण्याची वाट सुद्धा पाहिली.”
सश्याच्या या जीवाच्या शर्यतीचा व्हिडीओ लोकांना खूपच आवडलाय. हा व्हिडीओ पाहून लोक सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यावाचून स्वतःला आवरू शकत नाहीत.