राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीच्या लग्नाआधीच्या उत्सवाची चर्चा अजूनही सर्वत्र सुरु आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल होत आहे. दरम्यान सध्या राधिका मर्चंटचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अन्न सेवा कार्यक्रमादरम्यान राधिका मर्चंटने एका चिमुकल्याला पाहून ‘एकदम कृष्णा लागे छे’ अशी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान तिच्या या प्रतिक्रियेला एका चाहत्याने म्युझिकल मेकओव्हर दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न सेवा कार्यक्रमादरम्यान अनंत आणि राधिका सर्वांना जेवण वाढताना, त्यांची विचारपूस करताना दिसले होते. सोशल मीडियावर या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राधिका एका चिमुकल्या मुलाला पाहून खुश होते आणि त्याचे कौतुक करते आणि म्हणते की, “एकदम कृष्ण लागे छे”, म्हणजेच भगवान कृष्णासारखे दिसत आहे. तिची प्रतिक्रिया इतकी गोंडस होती की चाहते पुन्हा पुन्हा तो व्हिडीओ पाहत होते. दरम्यान संगीतकार मयूर जुमानी याने तिच्या या प्रतिक्रियेला गाण्याची जोड दिली आहे. “एकदम कृष्ण लागे छे”चे म्युझिकल व्हर्जन सुंदर असून नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. संगीतकार यशराज मुखाटे यांनी व्हिडीओ आवडल्याचे कमेंट करून सांगितले आहे.

हेही वाचा – “माझी आवडती व्यक्ती…..” लेकीचा निबंध वाचून आई झाली चकित; तुम्हालाही येईल हसू

हा व्हिडीओ शेअर करताना जुमानी याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या डोक्यातून ‘एकदम कृष्ण लागे छे’ जात नाहीये. जामनगरच्या कार्यक्रमाचा हँगओव्हर अजूनही उतरला नाही” व्हिडीओच्या सुरुवातीला राधिका मर्चंट जय श्री कृष्ण म्हणून लोकांना अभिवादन करते आहे त्यानंतर Wow एकदम कृष्ण लागे छे असे म्हणताना दिसत आहे. त्यानंतर कलाकार त्याला संगीतमय करतो आणि त्याचे स्वरुप बदलून टाकतो.

हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून, क्लिपने १.४ मिलियन पेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे आणि हा आकडा आणखी वाढत आहे. लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स पोस्ट केल्या.

हेही वाचा – अनाथ हत्तीच्या पिल्लाची काळजी घेताना दिसले IFS अधिकारी, सुंदर फोटोने जिंकले नेटकऱ्यांचे मन

इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी या गाण्याबद्दल काय म्हटले?

यशराज मुखाटे यांनी या गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत ‘आवडले’ असे लिहिले.

आणखी एकाने लिहिले , “ही सर्वोत्तम व्हर्जन आहे”.

तिसऱ्याने व्यक्त केले, “ती बासरी, OMG!”. हीच भावना व्यक्त करताना, आणखी एकाने “हा बासरीचा भाग खूप सुंदर आहे” असे सांगितले.

एका व्यक्तीने गाण्याच्या “लाँग व्हर्जन”ची मागणी केली.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा जामनगरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला देशभरातून आणि जगभरातून पाहुणे उपस्थित होते. अब्जाधीश मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा २०२२ मध्ये उद्योगपती वीरेन मर्चंट आणि उद्योगपती शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटबरोबर ‘रोका’ सोहळा झाला.२०२३ मध्ये, त्यांची औपचारिक साखरपुडा झाला. १ ते ३ मार्च या कालावधीत त्यांनी त्यांच्या लग्नाआधीच्या उत्सवाचे आयोजन केले होते. जुलैमध्ये हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.