टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे अनेकदा त्याच्या साधेपणासाठी ओळखले जातात. भारतीय क्रिकेटची एक मजबूत भिंत म्हटल्या जाणाऱ्या राहुल द्रविड यांचा साधेपणा पुन्ही एकदा दिसून आला. बंगळूरमध्ये पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा फोटो व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे राहुल द्रविड होय. कारण या कार्यक्रमात राहुल द्रविड अगधी शेवटच्या कोपऱ्यात अगदी शांतपणे बसलेले दिसून आले.

भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी ज्यांच्या मागे फक्त एका फोटोसाठी धावत असतात असे राहुल द्रविड यांचा हा साधेपणा पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. आपण एक सेलिब्रिटी असल्याचा कोणताही गर्व त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला नाही. एखाद्या सामान्य व्यक्तीसारखंच राहुल द्रविड या फोटोमध्ये शांत एक कोपऱ्यात बसलेले दिसून आले. भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या या साधेपणावर सारेच फॅन्स फिदा झाले आहेत. या फोटोने राहुल द्रविडने सर्व फॅन्सचं मन जिंकलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो बंगळूरमधला आहे. इथल्या एका बुक स्टोरमध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात माजी भारतीय खेळाडू जी विश्वनाथ हे आपल्या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी उपस्थित होते. याच कार्यक्रमात राहुल द्रविड सुद्धा आले होते. कार्यक्रमात अगदी शेवटला असलेल्या खुर्चीवर शांतपणे बसलेले होते. मात्र यावेळी त्यांनी त्यांचा चेहऱ्यावर मास्क लावला असल्याने कोणीच त्यांना ओळखू शकलं नाही. त्यांच्या शेजारी बसलेल्या एका मुलीला सुद्धा बऱ्याच वेळानंतर कळलं की आपल्या बाजुला भारतीय क्रिकेट विश्वातील एक महान खेळाडू बसलेला आहे.

काशी नावाच्या युजरने द्रविडच्या साधेपणाचा हा किस्सा ट्विटरवर शेअर केला आहे. ही व्यक्ती त्या बुक स्टोरमध्येही पोहोचली होती. त्याच्या ट्विटनुसार, जेव्हा गुंडप्पा विश्वनाथने जेव्हा नाव पुकारले तेव्हा त्याला द्रविडच्या उपस्थितीची माहिती मिळाली. GV च्या वारंवार विनंतीनंतर राहुल द्रविड पुढे यायला तयार झाले.

इथे पाहा हा व्हायरल फोटो :

या ट्विटनंतर राहुल द्रविडचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी राहुल द्रविडच्या साधेपणाचं कौतुक केलं आणि त्यांच्या साधेपणाचे किस्से शेअर करण्यास सुरूवात केली. राहुल द्रविडचा साधेपणा वारंवार दिसून आला. त्यामुळेच फॅन्स त्यांचं कौतुक करताना थकत नाहीत.

Story img Loader