उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आगामी निवडुकांसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीना टाळी देत काँग्रेसची ‘हात’मिळवणी केली. त्यामुळे राहुल आणि अखिलेश यांची जोडी युपीवर सत्तेची पकड मजबूत करण्यास यशस्वी होते का याकडे लक्ष लागलं आहे. नुकत्याच या जय विरूच्या जोडींने युपीमध्ये एक रोड शो केला होता. आता राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगण्यापेक्षा सोशल मीडियावर याची जास्त चर्चा रंगत आहे. या रोड शोच्या दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खाली उतरलेल्या केबल वायरपासून आपले डोके वाचवत राहुल गांधी खाली वाकले आहेत पण याच वेळी अखिलेश मात्र आरामात बसले आहे. आता अशा क्षणावर सोशल मीडियावर ट्रोलिंग झाले नाही तर नवलंच

VIRAL: फाटका कुर्ता घालतो म्हणणाऱ्या राहुल गांधींची सोशल मीडियावर उडवली खिल्ली

लखनऊमधल्या या रॅलीत या दोघांनी आपण एकाच सायकलचे दोन चाक असल्याचे सांगितले होते हे थोडे की काय दोघांनी आपण गंगा यमुना वगैरे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दोन दिवसांपूर्वीच या दोघांनी एक रोड शो केला होता. यात दोघेही गाडीच्या टपावर बसले होते. पण शहरातून फिरताना राहुल यांच्या डोक्याला सतत लटकणा-या केबलचा त्रास होत होता त्यामुळे शॉक लागेल की काय या भितीने आपले डोकं वाचवत राहुल गांधी खाली झुकले होते पण अखिलेश मात्र आरामात बसून होते. नेमका हाच प्रसंग कॅमेरात कैद झाला आणि यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाले. विजेचा धक्का लागेल म्हणून राहुल गांधी किती काळजी घेत आहे पण अखिलेश मात्र शांतपणे बसून आहेत कारण त्यांना माहिती आहे राज्यात वीजच नाही मग विजेचा धक्का तरी कसा बसणार? असे एक ना अनेक उपहासात्मक विनोद यावर व्हायरल होत आहेत.

वाचा : ४८ तासांत दिल्लीत सैन्य पाठवण्याचा दावा करणाऱ्या चिनी सरकारी वाहिनीचे भारतीयांनी काढले वाभाडे

Story img Loader