Rahul Gandhi Fact Check : लाइटहाऊस जर्नालिझमला काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले. यात राहुल गांधी हिंदूंनो विचार करा, असे म्हणत “एक दिवस भाजपा सत्तेतून बाहेर पडेल आणि मग काँग्रेसच हिंदूंवर कारवाई करेल”, असे म्हटल्याचा दावा केला जात आहे. अशाप्रकारे राहुल गांधी हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही काही जण करत आहेत. पण, राहुल गांधी यांनी खरंच असे कोणते विधान केले आहे का? व्हायरल होणारा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स वापरकर्ता शोभनाथ शर्माने सोशल मीडिया हँडलवर व्हिडीओसह व्हायरल दावा शेअर केला आहे.

rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?
MPs scuffle outside Parliament Case filed against Rahul Gandhi
संसदेबाहेर आखाडा! खासदारांमध्ये धक्काबुक्की; राहुल गांधींविरोधात गुन्हा
Rahul Gandhi booked for attempt to murder: Case details emerge.
Attempt To Murder : राहुल गांधींविरोधात हत्येच्या प्रयत्नाची तक्रार; संसदेत खासदार जखमी झाल्यानंतर भाजपाकडून मोठे पाऊल
Kangana Ranaut rahul gandhi
Kangana Ranaut : “संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत…”, कंगना रणौत यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप
Sanjay Raut on Chhagan Bhujbal
“भुजबळांचा वापर करणाऱ्यांनीच आज त्यांना…”, मराठा आरक्षण विरोधी आंदोलनावरून संजय राऊत यांची खोचक टीका

इतर वापरकर्तेदेखील व्हिडीओसह हाच दावा शेअर करत आहेत.

Read More News : कोचिंग क्लासेसवर विश्वास नाही, नारायण मूर्तींनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले, “पालकांनी चित्रपट पाहायचा अन्…”

तपास:

आम्ही रिव्हर्स इमेज सर्च आणि कीवर्ड सर्चचा वापर करून तपास सुरू केला.

आम्हाला CNBC-Awaaz च्या X हँडलवर सेम तोच व्हिडीओ सापडला, ती क्लिप जी खोट्या दाव्यासह वापरली जात होती.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे : इलेक्टोरल बॉन्ड पर राहुल गांधी का आया बयान

भाषांतर : राहुल गांधींचे निवडणूक रोख्यांवरील विधान

त्यांनी हिंदूंना धमकावल्याचा उल्लेख कॅप्शनमध्ये कुठेही आढळला नाही.

आम्हाला २९ मार्च २०२४ रोजी राहुल गांधींच्या एक्स हँडलवरही एक व्हिडीओ सापडला.

कॅप्शनमध्येही हिंदूंबद्दल काहीही उल्लेख नाही, व्हिडीओमध्येही ते ऐकू येत नाही.

आम्हाला न्यूज 24 च्या यूट्यूब चॅनेलवर एक बातमीदेखील मिळाली.

व्हिडीओमध्ये ते हिंदूंबद्दल नाही तर सीबीआय आणि ईडीबद्दल बोलताना दिसत आहेत.

निष्कर्ष : राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना हिंदूंना धमकावले नाही. संपूर्ण व्हिडीओमध्ये राहुल गांधी भाजपाने सीबीआय, ईडी आणि निवडणूक आयोगाला कसे शस्त्र बनवले आहे आणि सरकार बदलल्यावर कारवाई केली जाईल याबद्दल बोलताना दिसत आहेत, त्यामुळे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

Story img Loader