‘Rahul Gandhi Look A Like : काँग्रेसची भारत जोडो यात्रा गुरूवारी उत्तर प्रदेशातल्या शामलीमध्ये पोहचली. मोठ्या प्रमाणावर धुकं आणि थंडी असूनही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राहुल गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. अशात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या लुक अ लाईकचीही चर्चा होते आहे. फैसल चौधरी असं त्यांचं नाव आहे.

कोण आहेत फैसल चौधरी?


फैसल चौधरी हे राहुल गांधी यांचे लुक अ लाईक आहेत. ते अगदी हुबेहुब राहुल गांधींसारखेच दिसतात. राहुल गांधी यांचे लुक अ लाईक फैसल चौधरी हे मेरठमध्ये राहतात. राहुल गांधी यांच्यासारखे दिसत असल्याने त्यांची चर्चा होते आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी ते मेरठहून बागपतला पोहचले. या यात्रेत फैसल चौधरी यांची चर्चा झाली कारण ते सेम राहुल गांधी यांच्यासारख्याच टी शर्ट आणि तशाच दाढीमध्ये दिसले.

फैसल चौधरी यांची स्टाईल राहुल गांधींसारखीच

राहुल गांधी यांचे लुक अ लाईक फैसल चौधरी यांनी राहुल गांधी यांच्यासारखीच दाढी ठेवली आहे तसंच त्यांच्यासारखाच टी शर्टही घातला होता. त्यांनी आपल्या डोक्यावरच्या केसांची ठेवणही राहुल गांधींच्या केसांप्रमाणेच ठेवली आहे. फैसल चौधरी जेव्हा भारत जोडो यात्रेत पोहचले तेव्हा त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी गर्दी झाली. फैसल यांना पाहून सुरूवातीला पोलिसांनाही वाटलं की राहुल गांधीच आले आहेत.

फैसल चौधरी यांनी काय म्हटलं आहे?

फैसल चौधरी म्हणाले की मी राहुल गांधींचा मोठा चाहता आहे. राहुल गांधी यांच्यासारखाच मी दिसतो याचा मला अभिमान वाटतो. तसंच मला समाधानही वाटतं. गेल्या एक वर्षापासून लोकं माझ्याकडे फोटो काढायला येतात आणि मी अगदी राहुल गांधींसारखाच दिसतो असं मला सांगतात. लोक मला राहुल गांधी म्हणतात तेव्हा आनंद होतो असंही फैसल चौधरींनी सांगितलं.

फैसल चौधरी काँग्रेसचेच कार्यकर्ते

मी राहुल गांधींसारखा दिसतो म्हणून लोकं माझ्यासोबत फोटो काढतात. मात्र मी हे सांगू इच्छितो की मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे. भारत जोडो यात्रा ही खूप चांगली यात्रा आहे या यात्रेतून देशाच्या एकसंधतेचा संदेश जातो आहे. एवढंच नाही तर पुढे फैसल म्हणाले की देशातले सर्वात मोठे दोन मुद्दे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि तरूणांपुढे असलेली बेरोजगारीची समस्या या दोन महत्त्वाच्या समस्या आहेत. राहुल गांधी हे इमानदार नेते आहेत. त्यामुळेच मी त्यांना आदर्श मानतो. राहुल गांधींप्रमाणेच मीदेखील कडाक्याच्या थंडीत प्रवास करणार आहेत.

Story img Loader