Rahul Gandhi Planting Lotus: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे मीम्स व्हायरल झाले होते. राहुल गांधींचे जुने फोटो तर नेटकऱ्यांकडून वारंवार शेअर केले जात होते. अशातच आता लाइटहाऊस जर्नलिझमला मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येणारा एक फोटो आढळून आला आहे. यामध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे चिखलात कमळांची लागवड करताना दिसत आहेत. कमळ हे सत्ताधारी पक्ष, भाजपचे ‘पक्ष चिन्ह’ आहे त्यामुळे हा फोटो विशेषतः शेअर होत आहे. पण जर तुम्ही बारकाईने पाहिलंत तर तुम्हाला या फोटोमध्ये नेमकं खरं काय आहे हे लक्षात येईल. चला पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Dr Qamar Cheema ने व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.

अन्य यूजर्स देखील हा फोटो याच दाव्यासह शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. आम्हाला खरा फोटो इंडिया टुडेवरील लेखात आढळू आला.

https://www.indiatoday.in/india/story/rahul-gandhi-with-paddy-farmers-in-haryana-bjp-slams-congress-2404112-2023-07-09

हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील एका शेतात काढलेला हा पीटीआयचा फोटो असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे. हे आर्टिकल या फोटोसह जुलै २०२३ मध्ये प्रकाशित झाले होते. आम्हाला tribuneindia.com वरील लेखात देखील हाच फोटो आढळून आला.

https://www.tribuneindia.com/news/nation/rahul-gandhi-plants-paddy-saplings-interacts-with-farmers-in-haryanas-sonepat-see-video-526200

आम्हाला याचा व्हिडिओ रिपोर्ट देखील सापडला.

वरील फोटो आणि व्हिडिओंमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पक्षाचे चिन्ह असलेल्या कमळाचे फुल लावताना दिसत नव्हते.

हे ही वाचा<< महाराष्ट्रातील जातीय हिंसाचाराचा Video चर्चेत! पुजारी व भाविकांना मारहाण, नेमकी घटना कुठे घडली, का झाला वाद?

निष्कर्ष: नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालांनंतर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जाणारे फोटो, ज्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कमळाची फुले लावताना दिसतात, हे चित्र एडिट केलेले आहे. खऱ्या चित्रात राहुल गांधी हरियाणातील शेतकर्‍यांना भात पीक लावण्यासाठी मदत करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi gets down in mud planting lotus photo goes viral after rajasthan mp telangana election results fact check svs