काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे काँग्रेस आणि भारतातले तरूण नेते असले तरी तरुणांना मात्र ते फारसे पटत नाही असेच दिसते. त्यामुळे राहुल गांधींनी काही ट्विट केले की त्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. आता तर राहुल गांधींना देखील याची सवय झाली असेल असेच म्हणावे लागेल. उत्तराखंडमध्ये सोमवारी झालेल्या ऋषीकेश येथील रॅलीमध्ये राहुल गांधींनी जमलेल्या उपस्थितांना आपला फाटलेला कुर्ता दाखवला. अर्थात मी फाटके कपडे घालतो असे त्यांना जनतेला सांगायचे होते पण असे करणे त्यांच्या चांगलेच अंगाशी आले. कारण आता नेहमीप्रमाणे ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहे आणि या रॅलीनंतर त्यांच्या फाटक्या कुर्त्यातले फोटो आणि विनोद मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुधवार उजाडला तरी सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस काही कमी होईना.

ऋषीकेश येथील रॅलीमध्ये राहुल गांधींनी आपला फाटलेला कुर्ता जनतेला दाखवला. मी फाटलेले कुर्ते घालतो पण नरेंद्र मोदी कधीही फाटलेल्या कुर्त्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण ते नेहमींच देशातील गरिबीचे राजकारण करतात अशी टीका त्यांनी केली. पण नेहमीप्रमाणे त्यांची खेळी त्यांच्यावर उलटली आणि ते तोंडघशी पडले. आता याची सोशल मीडियावर चर्चा झाली नाही तर नवलच म्हणावे लागेल. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. कारण फाटलेला कुर्ता घालतो म्हणणारे राहुल गांधी हे नववर्ष साजरा करण्यासाठी परदेशात सुट्टीवर गेले होते. मग तेव्हा त्यांना देशातील गरिब जनता का दिसली नाही असे प्रश्न विचारले जात आहेत.

https://twitter.com/mojorojo/status/821257260869582848

https://twitter.com/sunilrajguru/status/821228221882449920

https://twitter.com/Indianwadhwa/status/821315473824329728

Story img Loader