काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लुक आता पूर्णपणे बदलला आहे. भारत जोडो यात्रा सुरू असताना राहुल गांधी यांची दाढी भरपूर वाढली होती. त्यांनी मात्र आता आपल्या लुकमध्ये पूर्ण बदल केला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दाढी नव्हती. मग हळूहळू ती वाढली. त्यानंतर ती इतकी वाढली की राहुल गांधी एखाद्या साधूप्रमाणे दिसू लागले होते. आता केंब्रिज विद्यापीठातला त्यांचा लुक मात्र पूर्णपणे बदलला आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान वाढलेली दाढी त्यांनी खूपच कमी केली आहे. नव्या लुकमध्ये राहुल गांधी एकदमम छान दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन युथ काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर फोटो

इंडियान युथ काँग्रेसने राहुल गांधींच्या नव्या लुकमधले फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये राहुल गांधीचा लुक पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. राहुल गांधी यांच्या लुकवर विविध प्रतिक्रियाही येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पवन खेरा यांना या बाबत विचारणा करण्यात आली होती तेव्हा ते म्हणाले होते लवकरच राहुल गांधी हे बदललेल्या लुकमध्ये दिसतील. आज राहुल गांधी बदललेल्या लुकमध्ये दिसत आहेत. त्यांचे हे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत.

राहुल गांधी यांचा बदललेला लुक कसा आहे?

नव्या लुकमध्ये राहुल गांधी हे एकदम स्मार्ट दिसत आहेत. त्यांनी दाढी ट्रीम केली आहे त्याचप्रमाणे केसही कापले आहेत. इतके दिवस टीशर्ट किंवा झब्बा घालणारे राहुल गांधी हे केम्ब्रिजमध्ये सुटाबुटात वावरताना दिसत आहेत. त्यांच्या या नव्या लुकची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर आणि ट्विटरवर रंगली आहे. अनेकांनी त्यांच्या या बदललेल्या लुकचं कौतुक केलं आहे. आता राहुल गांधी हे केंब्रिज विद्यापीठात पोहचले असून त्यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दाढी नव्हती. जेव्हा यात्रा संपली तेव्हा भल्या मोठ्या वाढलेल्या दाढीसह राहुल गांधी दिसले. त्यानंतर संसदेतही त्यांचा लुक तसाच दिसला यावरून आता राहुल गांधी हे बुहदा याच लुकमध्ये दिसतील असा अंदाज बांधला जात होता अशात राहुल गांधी यांचा बदललेला लुक समोर आला आहे. केंब्रिज या विद्यापीठात त्यांचं लर्निंग टू लिसन द 21st सेंच्युरी या विषयावर लेक्चर आहे.यासाठी राहुल गांधी हे ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi new look at cambridge university bharat jodo beard now trimmed scj