Rahul Gandhi Viral Photo: सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असून या निवडणुकीच्या काळात प्रत्येकजण आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडे सभा, मेळाव्यांचा धडाका पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांची आश्वासने, भाषणेदेखील सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नागरिकांनी निवडून दिल्यानंतर पाच वर्ष चेहरा न दाखवणारे नेतेदेखील प्रचाराच्या काळात घरोघरी जाऊन मतदान मागताना दिसतात, त्यांचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात, ज्यावर लोक अनेक मिम्सदेखील तयार करतात. दरम्यान, अशातच आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा पार पडली होती. त्यांची ही सभादेखील खूप चर्चेत होती. या सभेनंतर त्यांचे काही फोटो सध्या खूप चर्चेत आले आहेत, ज्यात ते चक्क एका रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या सलूनमध्ये बसून केस कापून आणि दाढी करून घेताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो खूप चर्चेत आला आहे.

Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Sharad pawar mocks Amit Shah And Said this About him
Sharad Pawar : शरद पवारांनी उडवली अमित शाह यांची खिल्ली! म्हणाले, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”

राहुल गांधींचा हा व्हायरल फोटो x(पूर्वीचे ट्विटर) वरील @Anshuman Sail Nehru या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये फोटोसोबत एक कॅप्शनदेखील शेअर करण्यात आली आहे. यामध्ये लिहिण्यात आलंय की, “राहुल गांधींनी ‘न्यू मुंबा देवी हेअर कटिंग सलून’, रायबरेली येथे नवीन हेअर कट आणि दाढी केली.” शिवाय त्या खाली ‘उत्तर प्रदेशचे राहुल’, असंदेखील लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, या व्हायरल फोटोवर आतापर्यंत २४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून दोन हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाइक केले आहे. शिवाय अनेक जण यावर कमेंट्सदेखील करत आहेत. ज्यात अनेक जण त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत, तर काही जण लोकांची सहानुभूती मिळावी यासाठी केलेला स्टंट असल्याचं म्हणत आहेत.

हेही वाचा: ही मुलगी वेडी आहे का? दात काढण्यासाठी केला चक्क ड्रील मशीनचा वापर; VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले

पाहा फोटो:

दरम्यान, यापूर्वी रायबरेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेतदेखील एका तरुणाने राहुल गांधी यांना एक हटके प्रश्न विचारला होता, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. त्या तरुणाने राहुल गांधींना विचारलं होतं की, तुम्ही लग्न कधी करणार? तरुणाचा हा प्रश्न ऐकून सर्वजण मोठ्याने हसू लागले. त्यावेळी राहुल यांनी उत्तर दिलं की, “आता लवकरच लग्न करावं लागेल.” राहुल गांधी यांनी दिलेल्या या उत्तरानंतर कार्यकर्तेदेखील मोठमोठ्याने हसू लागले.

Story img Loader