Rahul Gandhi Says Modi Will Be Prime Minister Viral Video: लाइटहाऊस जर्नलिझमला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडीओ आढळला. या ‘व्हिडिओ’मध्ये राहुल गांधी ४ जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुढील पंतप्रधान होतील, असे म्हणताना दिसत होते. मोदी विरुद्ध गांधी या स्पर्धेत संपूर्ण देशभरात चर्चा होत असताना अचानक राहुल गांधी यांनी मोदींच्या पंतप्रधान पदी कायम राहण्याचं विधान करून शरणागती पत्करली आहे का असे प्रश्न या व्हायरल व्हिडीओखली केले जात आहेत. नेमकं हे प्रकरण काय व गांधींची ही सभा कुठे झाली याविषयी सविस्तर तपास खालीलप्रमाणे…
काय होत आहे व्हायरल?
X यूजर @Vijay_K_Jain ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडीओ शेअर करत आहेत.
फेसबुक वर देखील लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्याद्वारे कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च वापरून आमचा तपास सुरू केला.अशाच एका रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला YouTube वर एक व्हिडिओ सापडला.
व्हिडीओमध्ये राहुल गांधी ‘नरेंद्र मोदी ४ जून २०२४ पासून भारताचे पंतप्रधान राहणार नाहीत’ असे म्हणताना दिसत होते.त्यानंतर आम्ही व्हिडीओ आणि बातम्यांचे रिपोर्ट्स तपासण्यासाठी वरील विधानावर गूगल सर्च केले.
आम्हाला द हिंदूच्या वेबसाइटवर एक बातमी सापडली, ज्याचे शीर्षक आहे: मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान म्हणून परत येणार नाहीत, राहुल गांधी यांचे विधान.
इतर मीडिया संस्थांनीही सदर वृत्त प्रकाशित केले होते.
आम्हाला काँग्रेसच्या अधिकृत X हँडलवर पोस्ट केलेला व्हिडीओ देखील सापडला जिथे त्यांनी एडिटेड व्हिडीओ वर टिप्पणी केली होती.
हा व्हिडीओ राहुल गांधी यांनी देखील रिट्विट केला होता. त्यात राहुल यांनी कॅप्शनमध्ये म्हटले होते की,”खोट्यांचा कारखाना आहे. भाजपाने स्वतःला कितीही दिलासा दिला तरी काही फरक पडणार नाही. पुन्हा एकदा सांगतोय की ४ जून २०२४ ला मोदी पंतप्रधान राहणार नाही देशाच्या कानाकोपऱ्यात इंडियाचे वादळ पसरले आहे.”
आम्हाला गुगल सर्चद्वारे कळले की हा व्हिडीओ राहुल गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील कानपूर येथील सार्वजनिक भाषणाचा आहे.
व्हिडीओमध्ये सुमारे ४३ मिनिटांनी राहुल गांधी त्यांचे भाषण सुरू करतात आणि ४६ व्या मिनिटाला म्हणतात की “४ जून २०२४ रोजी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणार नाहीत. ते भारताचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत.”
निष्कर्ष: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ४ जून २०२४ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असे म्हटले नाही. व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. व्हायरल दावे खोटे आहेत.