सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही अनेक अपघाताचे व्हिडीओ देखील पाहिले असतील, जे अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. स्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक अपघाताचे व्हिडीओ यामध्ये कैद होत असतात. असाच एका विचित्र कार अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. कारण मागच्या काही दिवसांपासून इतके भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत की, लोकांनी ते पाहिल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे.
कर्नाटकातील रायचूर इथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव कारने आधी दुचाकीस्वाराला आणि नंतर वेगावर नियंत्रण न आल्याने विद्यार्थ्यांना फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. कारच्या धडकेत विद्यार्थिनी १५ फूट उंच उडाली आहे. तर दुचाकी चालकही उडून पडला आहे. ही सर्व घटना रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: घराचा दरवाजा लॉक झालाय आणि चावी नाहीये? काळजी करु नका एक ‘फुगा’ करेल तुम्हाला मदत
सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे..नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचं, सावधान राहण्याचं सांगितलं जातं.