Viral video: गोपालकाला म्हंटलं की डोळ्यासमोर येते दहीहंडी आणि बाळगोपाळांच्या मनोऱ्यांचे थर असे चित्र येते. राज्यात साजरा केला जाणारा गोपळकाला हा मोठा सण आहे. गोपळकाल्याच्या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी दहीहंडी स्पर्धा भरवण्यात येतात. त्यामुळे या सणाची सर्वच वाट पाहत असतात. यंदा गोपळकाला ७ सप्टेंबर रोजी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यामध्ये तुम्ही पाहू शकता ४० फुट खोल असलेल्या विहिरीवर ही दहीहंडी बांधली जाते. आता तुम्ही म्हणाल, विहिरीवर बांधलेली हंडी फोडायची कशी? या प्रश्नातच उत्तर लपलंय. गोविंदा एकावर एक थर न रचता ही हंडी फोडतात. गोविंदा विहिरीच्या कठड्यावर 3-4 गोविंदा उभे राहतात. त्यापैकी एका गोविंदाला हे बाकीचे गोविंदा आपल्या खांद्यावर घेऊन दहींहडीच्या दिशेने थ्रो करतात. अशा प्रकारे हा थरराक आणि भन्नाट दहहींडीचा सण साजरा केला जातो.

होसाळीकरांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर गेल्या वर्षी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. गोपाळकालाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ अलिबागच्या कुर्डुस देऊळआळीमधील आहे. या गावात विहिरीत दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – धक्कादायक! गटाराच्या पाण्यात शिजवायचा बिर्याणी; Video Viral होताच संतप्त नागरिकांनी चोप चोप चोपला

सुमारे ३० वर्षांपूर्वी सुरू झालेली ह्या दहीहंडीचा आनंद आजही घेण्यात येतो. अलिबाग तालुक्यातील कुर्डुस येथील थरारक अशी ही दहीहंडी तरुणांचे आणि गावकऱ्यांचे आकर्षण बनली आहे.