Raigad Irshalwadi Landslide : खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी गावावर काल रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला २१ जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली ६० ते ७० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून त्यांचा शोध सुरु आहे.स्थानिक प्रशासन, एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली. अतिवृष्टीमुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान एका ट्रेकर तरुणानं इर्शाळवाडी गावातील ग्रामस्थांसोबतच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. हे फोटो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल हे नक्की.
इर्शाळवाडी म्हणजे निसर्गाची खाणच जणू आणि इर्शाळगडाला जाण्याआधी मधल्या पट्ट्यात ही ही इर्शाळवाडी लागते. ट्रेकिंगसाठी जाणारे लोक इथूनच जातात. हा मधला पट्टा मानला जातो. इर्शाळगडावर जाण्याआधी तुम्हाला या वाडीतूनच जावं लागतं असंही ट्रेकर्स सांगतात. इर्शाळवाडी जशी सात दिवसांपूर्वी होती त्यापेक्षा भयंकर चित्र आज आहे. अत्यंत विदारक आणि भयानक स्थिती आहे झाली आहे. दरम्यान एका ट्रेकर तरुणानं गेल्यावर्षीचे इर्शाळवाडीतील ग्रामस्थांसोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ट्विटरवर काही फोटो शेअर करत या आठवणी त्यानं जागा केल्या आहेत.
हक्काचं छप्पर उद्धस्त झालं
त्यानं कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे की, आता गरे, काळा चहा, वरण-भात कोण खाऊ घालेल? फोटोत दिसणा-या मावशी सुखरुप असतील, हीच आशा. तसंच तो पुढे म्हणतो, अनेक वर्ष इर्षाळगडवर ट्रेकींगला जातोय. इथल्या गावक-यांसोबत जवळपास घरच्यांसारखे ऋणानुबंध आहेत. सकाळी लवकर, रात्री-अपरात्री कधीही जा, हक्काचं छप्पर होतं. आता ते छप्परच उद्धस्त झालंय
पाहा फोटो
हेही वाचा – VIDEO: शुल्लक कारणावरुन भयंकर शेवट! दिल्लीत तरुणाला बोनेटवर एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं
अजून किती लोक दुर्घटनेमध्ये अडकली आहेत हे अद्यापही कळलेलं नाही. कारण जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा अनेक लोक घाबरुन दुसरीकडे पळून गेली आहेत. या घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी अडचण जरी निर्माण होत असली तरी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.