छत्तीसगडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेने चक्क हनुमानाला थकीत पाण्याची बिले जमा करण्याची नोटीस पाठवली आहे. खरं तर ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटतं असली तरी खरी आहे. ही नोटीस हनुमान मंदिरातील पाणीपट्टी थकबाकीबाबत बजावण्यात आली आहे. मात्र ही नोटीस देताना हनुमानच्या नावाने देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला एकही नळ कनेक्शन नाही आहे. हे प्रकरण शहरातील वॉर्ड क्रमांक १८ दरोगापारा येथील असून या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिराला दिलेल्या नोटीसमध्ये अमृत मिशन अंतर्गत दोन महिन्यांची ४०० रुपयांची थकबाकी असल्याचं नोंदवण्यात आलं आहे.

मंदिराजवळ एकही नळ नाही

रायगड महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने प्रभाग क्रमांक १८ दरोगापारा येथे असलेल्या छोट्या हनुमान मंदिराला ४०० रुपयांची पाणीपट्टी नोटीस देण्यात आली आहे. पंधरा दिवसांत पैसे न भरल्यास कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या मंदिराला ही नोटीस देण्यात आली आहे, त्या मंदिरात एकही नळ नाही आहे.

( हे ही वाचा: Viral Video: कुर्ल्यात चालकाने थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरच आणली रिक्षा, आरपीएफ जवान धावत पोहोचले अन्….)

अशी नोटीस दिल्याचे वृत्त समजल्यानंतर भाजपचे नेते या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्याचवेळी मनपाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने हनुमान मंदिराला नोटीस देणे हे समजण्या पलीकडचे असल्याचे प्रभाग क्रमांक १८ मधील स्थानिकांचे म्हणणे आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देवाच्या नावाने नोटीस देऊन मोठी चूक केली आहे.

( हे ही वाचा: CCTV: चक्क पोलीसानेच केली चोरी! बंद दुकानाबाहेरील बल्ब चोरल्याच्या घटनेने उडाली खळबळ; पाहा Viral Video)

या संपूर्ण प्रकरणात कार्यकारी अभियंता नित्यानंद उपाध्याय यांनीही अमृत मिशनच्या नळ कनेक्शनचे काम कामगारांकडून झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्याची एन्ट्री संगणकाद्वारे झाली होती. त्याच क्रमाने हनुमान मंदिराला नोटीस पाठवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितले. या परिसराचा सर्व्ह सुरू आहे. त्यानुसार कोणकोणत्या घरात नळ कनेक्शन देण्यात आलं त्याची माहिती घेण्यात येणार आहे. असंही त्यांनी सांगितले आहे

Story img Loader