Railway accident video: रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई’, असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक धक्कादायक घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये एका व्यक्तीचा पाय अडकतो अन् त्यानंतर जे होतं त्याचा तुम्ही विचारही नाही करु शकत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमची प्रिय व्यक्ती घरी वाट बघत आहे

प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये एका व्यक्तीचा पाय अडकतो. ती व्यक्ती आपला पाय काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते, पण त्याला यश येत नाही. यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले इतर प्रवासी त्याच्याभोवती जमा होऊ लागतात. यानंतर काय होते ते पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक छोटेसे आनंददायी हास्य येईल.व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आनंदापेक्षा जास्त आश्चर्य वाटेल. मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कितीही घाई असली तरीही धावती लोकल पकडण्याची चूक करायची नाही कारण तुमची प्रिय व्यक्ती घरी वाट बघत असते.

प्रवाशांनो थरारक VIDEO पाहाच

मुंबईत नेहमी व्यस्त आणि धावपळीत असलेले रेल्वे प्रवासी अपघातांकडे कधी लक्ष देखील देत नाही पण ऑस्ट्रेलियात एक अशी घटना घडली ज्यात एका प्रवाशाचा फसलेला पाय काढण्यासाठी लोकांनी चक्क मेट्रो ट्रेन आपल्या हातांच्या बळावर हलवली. हळूहळू इतर प्रवासीही तेथे मोठ्या प्रमानात गोळा झाले. खूप प्रयत्न करूनही त्या व्यक्तीचा पाय काढण्यात मेट्रो कर्मचाऱ्य़ांना यश येत नव्हते. शेवटी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करत मेट्रो ट्रेन चक्क हाताच्या बळावर हलवली आणि त्या व्यक्तीचा पाय सुखरूप बाहेर काढला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुणे तिथे काय उणे! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर महिलांसाठी सूचना; वाचून म्हणाल “पुणेकरांना एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून?”

ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्यक्तीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर पोलीस आणि व्यक्तीच्या मदतीला शेजारी असलेले प्रवासी तत्काळ धाऊन आल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ sachkadwahai नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका युजरने लिहिले की, “संघटनेत ताकद आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “आपण सर्व यासाठीच जगतो. प्रेम आणि आदर.” “जेव्हा आपण एकमेकांना आपले म्हणून पाहू लागतो तेव्हा आयुष्य खूप सुंदर बनते.” आणखी एका युजरने लिहिले की, “जर हे भारतात घडले असते तर लोकांनी त्यांचे फोन काढून व्हिडिओ बनवत राहिले असते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway accident video young mans leg stuck between platform and train passengers save victims life by pushing train like this watch heart touching video srk