Railway accident video viral : रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई’, असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक मुंबईमधली धक्कादायक घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. ३३ सेकंदाचा हा व्हिडिओ हृद्याचा ठोका चूकवणारा आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या एका महिला कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावून एका महिलेला ट्रेनच्या अपघातापासून वाचवलं आहे. एका महिलेनं धावती एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला असता तिचा तोल गेला. त्यानंतर ती महिला एक्स्प्रेसच्या दिशेनं फरफटत गेली. त्याचदरम्यान ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसाने क्षणाचाही विलंब न लावता एक्स्प्रेच्या दिशेनं धाव घेऊन महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.आरपीएफ जवानाने तेव्हा तत्परता दाखवत तिला वाचवलं अन्यथा ती चाकाखाली जाण्याची शक्यता होती.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. महिलेला सुखरूप बाहेर काढल्यानंतर पोलीस आणि महिलेच्या मदतीला शेजारी असलेले प्रवासी तत्काळ धाऊन आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बाप बापच असतो! लेकीला मृत्यूच्या दारातून आणलं परत; वडिलांच्या तत्परतेनं वाचले प्राण, थरारक VIDEO

या महिला कर्मचाऱ्याचंही सोशल मीडियावर कौतुक होतंय. हा व्हिडीओ @WesternRly या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, ही संपूर्ण चूक त्या महिलेची आहे. तीनं वेळेवर यायला हवं होतं. तर दुसऱ्या एका युजरनं, आरपीएफ जवानाच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना केरळच्या तिरूर रेल्वे स्थानकावर नुकतीच घडली होती. त्यावेळी अशाच प्रकारे रेल्वे पोलिसांनी धाडस करून एका चिमुकलीचं प्राण वाचवलं होतं.

Story img Loader