Railway crossing accident video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण सिग्नल सुरू असतानाही थेट वाहने रुळांवरून नेताना दिसतात. मात्र, हे किती धोकादायक आणि जीवावर बेतू शकते हे या व्हिडीओतून पाहायला मिळाले आहे.

हा व्हिडीओ रेल्वे क्रॉसिंगचा आहे. तेथून ट्रेन जाणार असते म्हणून लोक आणि गाड्यांना तेथे थांबवण्यात आले आहे. परंतु, असे असतानाही काही लोक तेथे न थांबता, रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये काही दुचाकी चालक दिसत आहेत. एकाची गाडी यातून पार झाली. याचा अर्थ असा नाही की, ट्रेन येण्याआधी सर्व जण सुखरूपपणे पलीकडे पोहचू शकतात. अशा वेळी घाई करून आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा कधीही थोडा वेळ थांबलेले बरे ठरते.

मात्र, या डंपर चालकाने रुळावरुन डंपर नेण्याचं धाडस केलं आणि तेवढ्यात ट्रेन आली. यावेळी ट्रेननं डंपरला जोरदार धडक दिली..त्यानंतर डंपर धडक लागल्यानंतर एका बाजुला झाला. यावेळी तिथेच एक कार उभी होती, हा डंपर कारवर पडणार तेवढ्यात तो कारपासून थोडा पुढे सरकतो आणि कार सुखरुप राहते. अचानक चमत्कारच झाल्यासारखा हा प्रकार व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ pro_capitalmotivation07 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये”संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” असं लिहलं आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय,

Story img Loader