Railway crossing accident video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण सिग्नल सुरू असतानाही थेट वाहने रुळांवरून नेताना दिसतात. मात्र, हे किती धोकादायक आणि जीवावर बेतू शकते हे या व्हिडीओतून पाहायला मिळाले आहे.

अति घाई संकटात नेई

Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ रेल्वे क्रॉसिंगचा आहे. तेथून ट्रेन जाणार असते म्हणून लोक आणि गाड्यांना तेथे थांबवण्यात आले आहे. परंतु, असे असतानाही काही लोक तेथे न थांबता, रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये काही दुचाकी चालक दिसत आहेत. एकाची गाडी यातून पार झाली. याचा अर्थ असा नाही की, ट्रेन येण्याआधी सर्व जण सुखरूपपणे पलीकडे पोहचू शकतात. अशा वेळी घाई करून आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा कधीही थोडा वेळ थांबलेले बरे ठरते. मात्र, या बाईकचालकाने हीच चूक केली; ती म्हणजे दुसऱ्याचे पाहून बंद झालेले रेल्वे फाटक क्रॉस केले. मात्र, याच वेळी तो रुळापर्यंत पोहोचतो तेवढ्याच प्रचंड वेगात ट्रेन येते अन् पुढे काय झाले याचा तुम्ही विचारही करू शकत नाही.

नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन येत असल्यामुळे सर्व जण थांबले आहेत. मात्र, असे असतानाही एक बाईकचालक रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतो अन् तेवढ्याच प्रचंड वेगात ट्रेन येते आणि बाईकला जोरदार धडक देते. नशीब बलवत्तर म्हणून हा चालक वेळीच बाईक सोडून मागे आला. सेकंदाचा जरी उशीर झाला असता, तर बाईकबरोबर ती व्यक्तीही ट्रेनच्या धडकेने उडाली असती. यावेळी व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे की, बाईकचा पूर्णपणे चोळामोळा झाला आहे; मात्र सुदैवाने यामध्ये कुणाचाही जीव गेलेला नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: एका निर्णयानं मृत्यूला रोखलं; भरधाव वेगात कार अन् समोरचा रस्ताच गेला वाहून, कार चालकानं काय केलं पाहाच

नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.