Railway crossing accident video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण सिग्नल सुरू असतानाही थेट वाहने रुळांवरून नेताना दिसतात. मात्र, हे किती धोकादायक आणि जीवावर बेतू शकते हे या व्हिडीओतून पाहायला मिळाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा