Shocking video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत असतात. हेच व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात. तसेच येथे आपल्याला असे काही व्हिडीओदेखील पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो आपल्यासमोर एक उदाहरण ठेवत आहे की, लोकांनी नियम मोडले की त्यांच्यासोबत काय घडू शकतं. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल तर थांबा. काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्यावर हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.
“अति घाई संकटात नेई”
खरंतर असे अनेक नियम आहेत, जे शासनाने आपल्या फायदा आणि सुरक्षेसाठी बनवले आहेत. परंतु, आपण त्याकडे लक्ष न देता नियम मोडत राहतो. असंच काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका व्यक्तीसोबत गंभीर घटना घडली. हा व्हिडीओ रेल्वे क्रॉसिंगचा आहे. तेथून ट्रेन जाणार असते म्हणून लोकांना आणि गाड्यांना तेथे थांबवण्यात आले आहे. परंतु, असं असतानाही काही लोक तेथे न थांबता रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काही रिक्षावालेसुद्धा दिसत आहेत. एकाची रिक्षा यातून पार झाली याचा अर्थ असा नाही की ट्रेन येण्याआधी सर्व सुखरूप पलीकडे पोहचू शकतात. अशावेळी घाई करून आपला जीव धोक्यात आणण्यापेक्षा कधीही थोडं थांबलेलं बरं. मात्र, या रिक्षाचालकानं हीच चूक केली; ती म्हणजे दुसऱ्याचं पाहून बंद झालेलं रेल्वे फाटक क्रॉस केलं. मात्र, याचवेळी त्याच्या रिक्षाचा टायर रेल्वे रुळात अडकला अन् पुढे काय झालं याचा तुम्ही विचारही करू शकत नाही.
रेल्वे रुळ ओलांडणं आलं अंगलट
या व्हिडीओमध्ये आधी एक ट्रेन येते. तेव्हा काही लोक आपल्या गाड्या घेऊन या ट्रेनपर्यंत पोहोचतात. परंतु, त्यानंतर आणखी एक ट्रेन येते, ज्यामुळे पुढे आलेल्या लोकांना पुन्हा मागे जावं लागतं. लोकं ट्रेनचा आवाज ऐकताच इकडे तिकडे पळू लागले. मात्र, यावेळी काही रिक्षाचालक रेल्वे रुळावरून पलीकडे जातात आणि एक रिक्षाचालक यामध्ये अडकतो. तो शेवटपर्यंत रुळात अडकलेली रिक्षा काढण्याचा प्रयत्न करतो; मात्र वेगात ट्रेन येते आणि रिक्षाला उडवते. यावेळी व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे, रिक्षाचा पूर्णपणे चुरडा झाला आहे, मात्र सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> टॉयलेटमध्ये बसून ऑनलाईन मीटिंग अटेंड करत होता नेता; चुकून कॅमेरा ऑन झाला अन्…VIDEO झाला VIRAL
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नेटकरी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.