सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की, त्याचे विविध मजेशीर पद्धतीत मिम्स तयार होतात. तर २०२३ च्या शेवटच्या दोन महिन्यांत, प्रसिद्ध आयएएस मुलाखतकार विजेंदर चौहान यांच्या संवादातील एका वाक्याने म्हणजेच “एंट्री अच्छी है, बस बैठने का तरीका थोडा कॅज्युअल है” या वाक्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अनेकांचं लक्ष वेधून घेतले. यूपीएससीच्या एका उमेदवाराच्या मॉक इंटरव्ह्यूदरम्यान त्यांनी या वाक्याचा उपयोग केला. तर या मिम्सचा एका अनोख्या पद्धतीत रेल्वे विभागाने उपयोग केला आहे.
भारताचे रेल्वे विभाग अनेकदा ताज्या घडामोडींची माहिती शेअर करण्यासाठी तसेच रेल्वे सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आकर्षक पोस्ट टाकत असतात. तर यावेळी त्यांनी ट्रेनच्या दारात बसणाऱ्या प्रवाशांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. लोकल मार्गांवर एक सामान्य दृश्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळते, ते म्हणजे लोक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे दरवाजे अडवून बसतात. त्यांच्या या अशा वर्तनामुळे इतर प्रवाशांनासुद्धा नेहमी त्रास होतो.
हेही वाचा…चाट विक्रेत्याचा अनोखा जुगाड! रॉयल एनफिल्डवर सुरू केला व्यवसाय; VIDEO एकदा बघाच…
पोस्ट नक्की बघा :
तर रेल्वे विभागाद्वारे एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात एक्स्प्रेस ट्रेन आहे. एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका डब्यात प्रवेश करण्याच्या दरवाजाजवळ दोन यात्री बसले आहेत, तर काही यात्री उभे आहेत. तर अशा अनेक प्रवाशांना सल्ला देण्यासाठी त्यांनी या फोटोवर हायलाइट करून लिहिलं की, “ट्रेन मै बैठने का तरीका बडा कॅज्युअल है” अशा शब्दांत त्यांनी या प्रवाशांची टीका केली आहे.
सोशल मीडियावर हा फोटो रेल्वे विभाग यांच्या अधिकृत @RailMinIndia या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “एक जबाबदार रेल्वे यात्री व्हा आणि दारात बसून प्रवास करू नका”; अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे आणि सोशल मीडियावर या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.