रेल्वेने प्रवास करण्यासाठी जेव्हा आपण तिकीट काढण्यासाठी रांग लावतो, तेव्हा एवढा वेळ लागतो की रागंते उभं राहून अक्षरशः कंटाळा येतो. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही म्हणाल, असा रेल्वे कर्मचारी सगळ्याच रेल्वे स्टेशनवर मिळाला की मग झटपट ट्रेनचं तिकीटही मिळेल आणि रांगेत उभं राहायला कंटाळाही येणार नाही. या व्हिडीओमधला रेल्वे कर्मचारी अशी नक्की काय जादू करतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वेंडिंग मशीनमधून एक रेल्वे कर्मचारी प्रवाश्यांना रेल्वे तिकीट काढून देत आहे. पण तिकीट काढून देताना या रेल्वे कर्मचाऱ्याचा वेग पाहिला तर तुम्ही हैराण व्हाल. एखादा रोबोट तिकीट काढून देतोय त्याप्रमाणे हा रेल्वे कर्मचारी पटापट तिकीट काढून देताना दिसत आहे. त्याच्या हाताची बोट तो मशीनवर इतक्या झटपट फिरवतो की पाहणारा केवळ पाहातच राहील. हा रेल्वे कर्मचारी अगदी सहज मशीनवर बोट फिरवत काही सेकंदात तिकीट काढून देतोय. कोणत्या ऑप्शननंतर कोणती स्क्रीन दिसेल, तसंच कोणतं बटण कुठे असेल हे सारं काही रेल्वे कर्मचारी डोळे झाकून क्लिक करू शकतो, असं दिसतंय.
आणखी वाचा : चिमुकल्याची ही जादू पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल, पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ मुंबई रेलवे यूजर्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या १८ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये त्याने एकूण तीन लोकांना तिकीट काढून दिलंय. व्हिडीओच्या शेवटी हा व्यक्ती कॅमेऱ्याकडे पाहून स्माईल देताना दिसून येतो. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून सारेच जण या रेल्वे कर्मचाऱ्याच्या टॅलेंटचं कौतुक करताना दिसत आहेत. @roshanofficiall या ट्विटर अकाऊंटच्या ट्विटनुसार, हा व्हिडीओ चेन्नईच्या एग्मोर रेल्वे स्टेशनचा आहे आणि व्हिडीओमध्ये दिसणारा कर्मचारी प्रत्यक्षात सेवानिवृत्त झाला आहे.
आणखी वाचा : बाबो! असलं वादळ पाहून अंगावर काटा येईल, कॅनडातल्या चक्रीवादळाचा VIDEO VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : चमत्कार! कुटुंबाचं सुरू होतं एकत्र जेवण, अचानक कोसळला सिलिंग फॅन, पाहा कसा वाचला मुलाचा जीव
हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत याला ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. ही व्यक्ती IRCTC पेक्षा जास्त वेगाने तिकीट बुक करत आहे, असं काही युजरने म्हटलंय. तर एका व्यक्तीने म्हटलं आहे की, सॉफ्टवेअरचा स्पीड सुपरफास्ट आहे, ज्यामुळे तो इतक्या वेगाने तिकीट बुक करत आहे, अन्यथा पुढील विंडो उघडण्यासाठी त्याला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली असती.