Viral video: रेल्वे रुळ ओलांडू नका, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात, पण यामध्ये अनोकांचा अपघात होतो. तर अनेक जण जिवानीशी जातात. सध्या अशीच एक घटना गुजरातमधून समोर आली आहे. एक वृद्ध रेल्वे रुळ ओलांडताना अडकतो आणि समोर ट्रेन येते. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीजडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमधील वापी स्टेशनवरचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वृद्ध व्यक्ती प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मात्र त्यांना वर काही चढता येत नाहीये. याचवेळी सुरत-वांद्रे टर्मिनस इंटरसिटी ट्रेन रेल्वे स्थानकात त्याच ट्रॅकवर येते. जशी रेल्वे येत असल्याचं वृद्धाच्या लक्षात येतं तसं ते घाबरतात आणि रुळावरच पडतात मात्र रेल्वे संरक्षण पोलीस जवानांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.वीरभाई मेरु असे या जीआरपी जवानाचे नाव आहे, त्यानं आपला जीव धोक्यात घालून वृद्ध प्रवाशाला वाचवलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जवानाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

रेल्वे रूळ ओलांडणे हा रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. रेल्वेस्थानकावर असलेल्या फूट ओव्हरब्रीजचा वापर करूनच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे सक्तीचे आहे. तरीसुद्धा कारवाईची चिंता न करता असंख्य प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: वय झालं तर काय झालं? ९७ वर्षांच्या आजीच्या धाडसाला सलाम, आनंद महिंद्र यांनीही केलं कौतुक

‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलं आहे. कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरुप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील काही मंडळी या सल्लाकडे दुर्लक्ष करतात. अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. याचिच प्रचिती देणारी ही घटना आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway guard risks life to save elderly man who fell before train in vapi railway station gujrat video viral srk