Ayodhya Railway Station कोट्यावधी राम भक्तांचे स्वप्न असेले राम मंदिराचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. अयोध्येत श्री रामाचे भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. येत्या २२ जानेवारी २०२४ ला या मंदिरात श्री रामाचे बाल रूप रामलालाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. अतिशय भव्य असे हे राम मंदिर भाविकांसाठी २२ जानेवारी २०२४ पासून खुले होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोद्धा रेल्वेस्थानकाचा व्हिडिओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राममंदिराच्या उद्घाटनासाठी संपूर्ण अयोद्धा सजली आहे. अयोद्धेत विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाले आहे. याचाच व्हिडिओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला आहे. अयोद्धा रेल्वे स्थानकाचे नाव अयोद्धा धाम असे ठेवण्यात आले. रेल्वे स्टेशन रोशनाई आणि सजावटीने सजलेले पाहायला मिळत आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अयोद्धा रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात संपूर्ण रेल्वे स्थानकाला रोशनाई करण्यात आली आहे. फुगे आणि फुलांनी सुदंर सजावट करण्यात आली आहे. रंगेबीरंगी लायटिंग करण्यात आली आहे. भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अयोद्धा धाम रेल्वे स्टेशन सुरू करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> विमान लँड होणार तोच आला सोसाट्याचा वारा अन्…; लंडनमध्ये प्लेन लँडिंगचा थरारक VIDEO व्हायरल

२२ जानेवारी, २०२४ रोजी या मंदिराचे लोकार्पण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीवर अभिषेक करतील.

रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

दगड पाणी शोषणार नाही, वातावरणातील कार्बनसोबत रिऍक्ट करणार नाही असे निकष घालून हे दगड निवडण्यात आलेत. ज्यांची चाचणी कर्नाटकातील म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे करण्यात आलीये. या वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती निवडण्यात येणार आहे. तयार केलेली नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल. दरम्यान प्राचीन मूर्ती ही चल असणार असून ती उत्सव मूर्ती म्हणून म्हटली जाईल.