Railway Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती म्हणावी लागेल. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रेल्वे भरती मंडळाने विविध ट्रेडमध्ये शिकाऊ पदांसाठी ४,२३२ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज प्रक्रिया चालू आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वे भरती 2025: रिक्त जागा तपशील

  • एअर कंडिशनिंग
  • सुतार
  • डिझेल मेकॅनिक
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
  • इलेक्ट्रिशियन
  • फिटर
  • चित्रकार
  • वेल्डर

रेल्वे भरती 2025: पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह इयत्ता १०वी उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

वयोमर्यादा: अर्जदार २८ डिसेंबर २०२४ पर्यंत १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असले पाहिजेत. आरक्षित श्रेणींसाठी वयाची अट लागू आहेत.

रेल्वे भरती 2025: निवड प्रक्रिया

कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. निवड दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीनंतर गुणवत्ता यादीवर आधारित असेल.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना ७,७०० रुपये ते २०,२०० रुपये मासिक पगार मिळेल.

अर्ज फी

सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी १०० रुपये

SC/ST/PH आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

हेही वाचा >> SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

आवश्यक कागदपत्रे

अर्जदारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

  • आधार कार्ड
  • दहावीची मार्कशीट
  • आयटीआय डिप्लोमा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
Railway Recruitment गुगलवर ट्रेंडिंग

रेल्वे भर्ती 2025: अर्ज कसा कराल

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: http://www.scr.indianrailways.gov.in.
  • “नवीन नोंदणी” लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
  • भविष्यातील संदर्भासाठी अंतिम अर्जाची प्रिंटआउट घ्या.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway opens 4232 apprentice vacancies for 10th pass students no written exam required google trends srk