सोशल मीडियाच्या जगात रोज धक्कादायक व्हिडीओ समोर येत असतात. यापैकी बहुतांश व्हिडीओ स्टंटचे, अपघाताचे असतात. वारंवार सांगूनही लोक पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात. उंच इमारतींवरून उडी मारणे, सार्वजनिक ठिकाणी नृत्य करणे, मारामारी करणे, वाद घालणे अशा सर्व प्रकारच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे, ज्यामध्ये एक महिला आणि तिची मुलगी धावत्या ट्रेनमधून उडी मारताना दिसत आहेत.
धावत्या रेल्वेतून खाली उतरू नये किंवा त्यामध्ये चढण्याचाही प्रयत्न करू नये, अशी सूचना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दिली जाते. या प्रकारे रेल्वेतून उडी मारल्यास कायमचं अपंगवत्व येण्याचा धोका असतो. तसेच प्रसंगी जीवही जावू शकतो. या सूचना सतत देऊनही अनेकदा या प्रकारच्या घटना घडतात. कारण अनेक वेळा लोक चालत्या ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना अशा घटनांना बळी पडले आहेत. अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेने तिच्या मुलीसह चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केलाय.
(हे ही वाचा : तरुणीची एक चूक अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना तरुणीबरोबर घडलं असं की..,पाहा मृत्यूचा थरारक VIDEO)
महिलेने चालत्या ट्रेनमधून मारली उडी
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली आहे, पण थांबलेली नाही. काही लोक ट्रेन थांबण्यापूर्वीच उतरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, एका महिलेने तिच्या लहान मुलीसह रेल्वेस्थानकावर उडी मारली. आधी लहान मुलीनं उडी मारली, त्यानंतर तिच्या आईने धावत्या ट्रेनमधून उडी मारली अन् तिचा तोल गेला आणि ती जोरदार आपटली. सुदैवाने ती महिला फलाटावर पडली आणि स्थिर राहिली, अन्यथा ती रेल्वेखाली जाऊ शकली असती. हा व्हिडीओ पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने स्थानकावरील सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. महिला आणि मुलीच्या जीवाचं काय झालं असतं? अशीच भीती सर्वांच्या मनात होती.
येथे पाहा व्हिडिओ
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @trainswithhaseeb नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला १६ कोटींहून अधिक लोकांनी पाहिलं आहे; तर १६ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ट्रेन जर थोडी वेगात असती तर त्यांच्यासोबत एखादी घटना घडू शकली असती. दुसऱ्याने लिहिले की, “पाकिस्तानात लोक अशा प्रकारे उतरतात.” अजूून एकाने लिहिले की, “पाकिस्तानात भौतिकशास्त्र शिकवले जात नाही”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.