रेल्वे कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून बगाहा येथील ट्रेनची दुरुस्ती केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात बगाहामध्ये पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलट आणि को-लोको पायलटने जीव धोक्यात घालून पुलाच्या मध्यभागी उभी असलेली ट्रेन दुरुस्त केली. यादरम्यान, लोको पायलट ट्रेन आणि रुळावर उतरून रेल्वेची दुरुस्ती करण्याच्या ठिकाणी पोहोचला. तर को पायलटने चक्क पुलावर लटकून तार ओढली, त्यामुळे ट्रेन पुन्हा सुरू होऊ शकली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही ट्रेन गोरखपूरहून नरकटियागंजला जात होती

गोरखपूरहून नरकटियागंजला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेन ०५४९७ च्या इंजिनमध्ये हवा गळती (Air Leakage) झाली होती. त्यामुळे वाल्मिकी नगर ते पाणीहवा दरम्यानच्या पुलावर गाडी बंद पडली. वाल्मिकी नगररोड स्टेशनवरून ट्रेन सुरू होताच यूएल व्हॉल्व्हमधून गळती सुरू झाली आणि ट्रेन KM-२९८/३० पुल क्रमांक ३८२ वर थांबली. पुलाच्या मध्यभागी गाडी थांबल्याने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण होते. पुलाच्या मध्यभागी यूएल व्हॉल्व्हला गळती सुरु झाली होती. अशा स्थितीत गळती बंद करणे हे आव्हान होते.

हेही वाचा – हत्तीच्या पिल्लाने लुटला अंघोळीचा आनंद! Viral Video पाहून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू

ट्रेनमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये दहशत

या आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनचे लोको पायलट अजय यादव आणि सहाय्यक लोको पायलट रणजीत कुमार यांनी जीवाची पर्वा न करता पुलावरून ट्रेनखाली पोहोचले आणि व्हॉल्व्ह दुरुस्त केला. ट्रेनची दुरुस्ती केल्यानंतर ती पुढे धावू शकली. इंजिनमध्ये हवा गळतीची समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. पण लोको पायलट अजय यादव आणि रणजीत कुमार यांनी धाडस दाखवून तत्काळ समस्येवर तोडगा काढला. जीव धोक्यात न घालता त्यांनी इंजिन दुरुस्त करण्याचे काम केले.

हेही वाचा – अविश्वसनीय! आकाशात उडणाऱ्या गरुडाने समुद्रातील माशावर मारली झडप; कधीही पाहिला नसेल असा दुर्मिळ Video Viral

रेल्वे दोन्ही कर्मचाऱ्यांचा सन्मान करणार आहे

या धाडसी कामाबद्दल दोघांनाही रेल्वे प्रशासनाकडून बक्षीस दिले जाणार आहे. डीआरएम बीना श्रीवास्तव यांनी सांगितले की, “गुरुवारी ट्रेनचा व्हॉल्व्ह खराब झाला होता, जो लोको पायलट आणि असिस्टंटने ट्रेनमधून खाली उतरवून दुरुस्त केला. या कामासाठी रेल्वे त्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस देणार आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी तो पूलही बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway workers repaired the train on the bridge in west champaran watch video snk