Railway stunt video: ट्रेनमधून प्रवास करताना दरवाजापासून दूर राहा ही सूचना कायम दिली जाते. चालत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणारे अनेक टवाळखोर तुम्ही पाहिले असतील. या टवाळखोरांमुळे इतरांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. अनेकवेळा कारवाई करुनही हे असले प्रकार बंद होताना दिसत नाहीत. कधी बाहेरुन रेल्वेमध्ये दगड मारल्याच्या घटना घडतात तर कधी प्लॅटफॉर्मवर उभ्या व्यक्तींच्या डोक्यात हे टवाळखोर मारतानाचे व्हिडीओ यापूर्वी पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र सध्या व्हायरल होत असलेला आणि चर्चेत आलेला व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. एक तरुण ट्रेनमधून बाहेर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तींना बेल्टने मारत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चालत्या ट्रेनच्या दारात एक तरुण उभा आहे. तरुण रेल्वेच्या दारात उभा राहून बाहेर प्लॅटफॉर्म वरील लोकांना बेल्टने मारत आहे. खूपच धक्कादायक दृश्य व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. ट्रेनमधील एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. भितीमुळे कुणीही त्याला थांबवण्याचाही प्रयत्न करत नसल्याचं व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. ही विकृती म्हणावं की काय हा प्रश्न सध्या नेटकरी विचारत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – जुन्नरमध्ये जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला जीव! एकाचा मृत्यू; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद

@I_DEV_1993 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरीही व्हिडीओ पाहून चांगलेच संतापले आहेत. तरुणावर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी सध्या मोठ्याप्रमाणात केली जात आहे. रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी ट्रेनने प्रवास करतात, त्यामुळे अशा हुल्लडबाज तरुणांमुळे इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.