मुंबईकरांच्या आजच्या दिवसाची सुरुवात रिमझिम पावसाने झाली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. आत्ताही काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे. मार्चमधल्या प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. पण अचानक आलेल्या या पावसामुळे नेहमीप्रमाणे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.
पावसामुळे अनेक मुंबईकरांना सकाळी सकाळी छत्री घेऊन ऑफिस गाठावं लागलं आहे. पण आजच्या या पावसात राजकीय मंडळीदेखील चांगलेच अडकल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांना ऐन उन्हाळ्यात पावसाळी अधिवेशनाचा फील आल्याचही पाहायला मिळत आहे. कारण अचानक आलेल्या पावसामुळे आमदार, सचिवांची पळापळ झाल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी मुंबईतील पावसावर अनेक वेगवेगळी मिम्स तयार केली आहेत. चला तर पाहूया मुंबईच्या पावसाची वेगवेगळी रुपं.
…अन् पावसाने आमदारांना पळवलं –
पावसामुळे तालिकाध्यक्ष सुनील भुसारा यांना सभागृहात पोहोचायला उशीर झाल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी ते विधिमंडळाच्या गेटवरून सभागृहात पळत गेले. त्यांचा पळत जातानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. या पावसामुळे अनेक अधिकाऱ्यांचीही धावपळ झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
एएनआयने एक सुंदर असा पावसातील व्हिडीओ शेअर केला आहे.
एकाने ट्विटमध्ये लिहिलं आहे फक्त मार्चमध्ये पाऊस पडताना बघायचं राहिलं होतं. –
एकाने मुंबईतील रोमॅंटीक वातावरण सध्या कसं आहे याचं मिम शेअर केलं आहे.
एका पठ्ठ्याने तर पावसाच पाणी घरात शिरल्यावर मुंबईकर दिवसभर कसे असतात याचं भन्नाट जुन मिम शेअर केलं आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, येत्या काही तासांत मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी –
आजच्या पावसाचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुकुंद कंपनी ते कळवा पूल येथे चार किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्याचंही पाहायला मिळत आहे.