सध्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे; ज्यामुळे अनेक ठिकाणचे नद्या आणि तलाव दुथडी भरून वाहू लागलीत. काही ठिकाणी रस्ते, रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. त्याशिवाय विमानतळ, बसस्थानकांनाही नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशात सोशल मीडियावर एका ट्रेनचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यात ट्रेनच्या छताला गळती लागल्याने पावसाचे पाणी टपकताना दिसतेय. या परिस्थितीमुळे काही प्रवासी चक्क ट्रेनमध्ये छत्री घेऊन प्रवास करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओ ट्रेनच्या चेअर कारचा आहे; ज्यामध्ये बसूनच प्रवास करावा लागतो. व्हिडीओत दिसतेय की, एक प्रवासी हातात छत्री घेऊन उभा आहे आणि त्याबरोबर काही मुलीदेखील आहेत. यावेळी ट्रेनच्या छतावरून पावसाचे पाणी छत्रीवर टपकत असल्याचे दिसत आहे. काही प्रवासी दूरच्या सीटवर बसले आहेत. पण, तो तरुण आणि काही तरुणी ट्रेनमध्ये पावसाचे पाणी ज्या ठिकाणी गळतेय, तिथे उभे राहून फोटो काढत आहेत.

व्हिडीओवर रेल्वेने दिले स्पष्टीकरण

केरळ काँग्रेसच्या @INCkerala नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “तरुण आता भारतीय रेल्वेचे भारतीय रीलमध्ये रूपांतर करीत आहे”, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओखाली दिलीय. केरळ काँग्रेसच्या या पोस्टवर रेल्वेने प्रत्युत्तर दिले आहे. रेल्वेने लिहिले की, सर, तुम्ही जुने व्हिडीओ का शेअर करीत आहात? याबरोबर रेल्वेने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यामध्ये हा व्हिडीओ ९ नोव्हेंबर २०२३ रोजी शेअर करण्यात आला होता. याचा अर्थ व्हिडीओ जुना आहे; जो पुन्हा एकदा शेअर केला जात आहे.

लाइव्ह रिपोर्टिंगवेळी पत्रकाराच्या हातावर कुत्र्याने घेतली झडप; पुढे जे घडले ते पाहून आवरणार नाही हसू ; पाहा VIDEO

मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. एकाने लिहिले की, ट्रेनमध्येच पाणी टपकत आहे आणि त्यामुळे परिस्थिती काय आहे हे सांगता येईल. दुसऱ्याने लिहिले की, मंत्री काहीही करू शकत नाहीत. त्यांनी राजीनामा द्यावा. आणखी एका युजरने लिहिले की, काँग्रेस बनावट व्हिडीओ शेअर करून, अपप्रचार करीत आहे.

पण, हा व्हिडीओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.