rain garaba Viral Video नवरात्रोत्सव देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. नऊ दिवस दुर्गा मातेची पुजा केली जाते. भक्त भावाने देवीचा आराधना केली जाते. नवरात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गरबा आणि दांडीया. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या उत्साहत गरबा आणि दांडीयाचे खेळ आयोजित केले जातात. तरुण -तरुणी पारंपारिक कपडे परिधान करून पांरपारिक नृत्य करताना दिसतात. गरबा आणि दांडिया हे पारंपारिक नृत्याचा प्रकार आहे. अनेकजण गरबा आणि दांडीया सुरु होण्याच्या महिनाभर आधी सुरवात करतात. अनेक लोक वर्षभर नवरात्र उत्सवाची वाट पाहात असतात. एवढ्या उत्साही लोकांना नवरात्रोत्सवामध्ये गरबा खेळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गरबा नृत्य हे देवीची आरती होण्यापूर्वी केले जाते, तर दांडिया नृत्य देवीच्या आरतीनंतर केले जाते. गरबा आणि दांडिया या दोन्ही नृत्यांची निर्मिती गुजरातमध्ये झाली आहे. सोशल मीडियावर नवरात्रोत्सवाचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये भर पावसातही तरुण-तरुणी गरबा नृत्य करत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा –पुण्याच्या मंडईत दिसली दुर्गामाता? देवीच्या रुपातील तरुणीला पाहून पुणेकर काय म्हणाले, पाहा Viral Video

हेही वाचा –“आयुष्य खूप सुंदर आहे फक्त….” ट्रॅक्टरवर चढून नाचणाऱ्या आजींचा नवा Video Viral, पुणेरी आजींची पुन्हा चर्चा!

व्हिडिओ एका चौकातील आहे जिथे तरुण तरुणी गाण्याच्या तालावर गरबा नृत्य करत आहे. धोधो पाऊस कोसळत असतानाही तरुण-तरुणी उत्साहात गरबा नृत्य करताना दिसत आहे. पावसात भिजत सर्वजण आनंदाने नृत्य करत आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना आडला आहे.
इंस्टाग्रामवर dahisarchi_aaibhavani नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कमेंटमध्ये लिहिले आहे की, “एक वेळ पाऊस थांबेल पण गरबा थांबणार नाही”

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले, “हीच मजा आहे,” दुसऱ्याने लिहिले, पावसात मुलींचे काय झाले असेल, मेकअप केला असेल तर पूर्ण पावसाने वाट लावली त्याची..”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain will stop for a time but not garba young girl boys playing garba dandiya in heavy rain viral video snk