अमेरिकेच्या योसेमाइट नॅशनल पार्कमधील एका सुंदर धबधब्याचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर पुन्हा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रसिद्ध धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा जोरदार वाऱ्यांमुळे रंग बदलतो आणि पांढऱ्या शुभ्र पाण्याला इंद्रधनुष्याचे रंग दिसू लागतो.
व्हिडिओमध्ये, अत्यंत जोरदार वाऱ्याने धबधब्याला वेढले आहे, सूर्य उगवताना पाण्यांच्या तुषारांपासून ढग तयार झाले. जेव्हा सूर्यप्रकाशाची किरणे पाण्याच्या थेंबांना स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या उंचावरून कोसळताना एक चमकणारे इंद्रधनुष्य तयार होते, जे संपूर्ण १४५० फूट धबधब्यावर पसरले आहे.
हेही वाचा – चला हवा येऊ द्या! पीएमपीएल बससमोर कारने घेतली माघार; व्हायरल होतोय व्हिडीओ
कॅलिफोर्नियतील एका पार्कमधील पर्वतांमधील या धबधभ्याने १३.७ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत आणि २००,००० पेक्षा जास्त पसंती मिळवल्या आहेत. योसेमाइट कॅलिफोर्नियामधील चार वेगवेगळ्या प्रादेशिक विभागांमध्ये पसरलेले आहे आणि अंदाजे ७६१, ७४७ एकर व्यापलेले आहे, ज्यामुळे ते आकाराच्या दृष्टीने देशातील १६ वे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान बनले आहे.
न्यूजवीकच्या मते, फुटेज मूळतः सॉल्ट लेक सिटीमधील फोटोग्राफर ग्रेग हार्लो यांनी शूट केले आहे असे मानले जाते जे आउटडोर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये माहिर आहेत. नॅशनल पार्क सर्व्हिस (NPS) च्या अंतर्गत २०१७ मधील डॉक्युमेंटरी फुटेजमध्ये सकाळी ९ वाजता “दिवसाच्या अचूक वेळी खूप जोरदार वारे वाहतात आणि त्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये असामान्यपणे जोरदार पाण्याचा प्रवास असतो असे सांगितले आहे.
हेही वाचा – जबरदस्त! लेझीम पथकाचे नृत्य पाहून तुम्हीही उत्साहाने नाचू लागाल! नेटकरी म्हणतायत,”व्हिडीओ एकदा पाहाल तर…”
“या विशेष परिस्थितींमध्ये पूर्वीपासून अज्ञात २४०० फूट इंद्रधनुष्य धबधबा तयार केला,” असे कॅप्शन हार्लोने त्याच्या YouTube अकाउंटच्या व्हिडिओसह पोस्ट केले आहे.
अलिकडच्या वर्षांत इतर अनेक लोकांनी या ठिकाणाचे फोटो काढले आहेत आणि व्हिडिओ बनवले आहेत.