महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिलेली मुदत आज म्हणजेच ३ मे रोजी संपत आहे. उद्यापासून म्हणजेच ४ मेपासून लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठण करा करण्याचं आवाहन राज यांनी देशभरातील हिंदू बांधवांना केलं आहे. यामुळे राज्याचं राजकारण तापले असताना सध्या राजकीय वर्तुळात भाजपा आणि मनसेच्या युतीचीही जोरदार चर्चा दिसून येत आहे. राजकीय वर्तुळात जरी राज ठाकरे आणि भाजपा यांची वैचारिक जवळीक वाढत असल्याची आणि युतीची चर्चा असली तरी समाजमाध्यमांवर मात्र राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची गाडी चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर झालं असं की, शर्मिला ठाकरे यांची गाडी सोमवारी मुंबईमधील नरीमन पॉइण्ट येथील भाजपाच्या कार्यालयाबाहेर दिसून आली. आता भाजपाच्या कार्यालयाबाहेर शर्मिला ठाकरेंची गाडी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आहे त्यावरून राज ठाकरे आणि भाजपाची युती आगामी काळामध्ये होणार का? किंवा विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या दाव्याप्रमाणे राज ठाकरे भाजपाच्या सांगण्यावरून हे सर्व करत आहेत का? असे प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहेत. आता आशा प्रकारच्या चर्चा सर्वत्र सुरू असताना शर्मिला ठाकरे यांची गाडी मुंबई येथील भाजपाच्या कार्यालयाबाहेर दिसून आल्यानंतर समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आले आहे.

मर्सडीज कंपनीची ही गाडी असून महाराष्ट्र ४६ जे ०००९ (MH 46 J 0009) असा या गाडीचा क्रमांक आहे. आता शर्मिला ठाकरे यांची गाडी भाजपा कार्यालयाच्या बाहेर कशी काय? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत आहे. ही गाडी भाजपा कार्यालय बाहेर कोण घेऊन आलं? नक्की या गाडीतून कोण आले आहे?. असे अनेक प्रश्न कालपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

याबाबतची सत्यता काय आहे?
शर्मिला ठाकरे यांची गाडी भाजपा कार्यालयाबाहेर दिसल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या. मात्र या मागची सत्यता काही वेगळीच आहे. सदर गाडी ही पूर्वी राज ठाकरेंच्या पत्नीच्या मालकीची होती. ही गाडी शर्मिला ठाकरे यांच्याकडून सतीश कोठावळे यांनी खरेदी केलेली आहे. सतीश कोठावळे ज्यांनी ही गाडी विकत घेतली आहे, त्यांनी ती सोमवारी भाजपा कार्यालयाच्या समोर लावल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. त्यांनी ही गाडी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडून विकत घेतली असून आता ती गाडी सतीश कोठावळे यांच्या नावावरती करण्यासाठी आरटीओकडे कागदपत्रे दिली असल्याचे कोठावळे यांनी सांगितले. कोठावळे यांनी ही गाडी १४ एप्रिल रोजी खरेदी केली आहे. कोकाटे यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर या गाडीमधील राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळालाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray car outside bjp office mumbai here is the truth scsg