आज जर काही लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचं म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात मग स्वातंत्र्य! असा मथितार्थ असलेले व्यंगचित्र राज ठाकरे यांनी चितारले आहे. टेंबू, कराड येथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेचा उल्लेख करत राज यांनी सदर व्यंगचित्र काढले असून त्यांनी सध्या देशाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा उल्लेख या व्यंगचित्रात केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँकांना लुटून फरार झालेले उद्योगपती, महिलांवरील वाढते अत्याचार, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, धार्मिक तसेच जातीय संघर्ष, बेरोजगारी असे विविध भीषण प्रश्न पार्श्वभूमीवर दाखवत लोकमान्य टिळकांनी आज असते तर समाजसुधारक आगरकरांच्या भूमिकेचं एका शतकानंतर समर्थन केलं असतं असं राज यांनी सुचवलं आहे.

लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर हे समकालिन दिग्गज होते, परंतु स्वातंत्र्य आधी अशी टिळकांची मागणी होती तर समाजसुधारणांना अग्रक्रम द्यावं असा आगरकरांचा आग्रह होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackrey cartoon lokmany tilak agarkar