Raja vlogs video viral : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका व्यक्तीचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. याचं कारण या व्यक्तीने आपल्या लग्नातील प्रत्येक छोट्या मोठ्या विधीचा व्हिडीओ शूट केला आहे. त्याने लग्नातील सप्तपदीपासून ते लग्नानंतरच्याही सर्व परंपरा व्हिडीओतून लोकांसमोर आणलं. तो व्यक्ती म्हणजे राजा व्लॉगर. यावेळी त्याला नेटकऱ्यांनी ट्रोलंही केलं. अगदी हळदीपासून मंगळसुत्र विधीपर्यंत आणि रिसेप्शन पासून पार हनीमूनपर्यंत प्रत्येक क्षण तो आपल्या कॅमेऱ्यात कैद करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतोय. अरे यानं तर संपूर्ण लग्नच यूट्यूबवर टाकलं म्हणत अनेकांनी याची मस्करीही केली. अन् या व्हिडीओंच्या माध्यमातून तो चांगली कमाई करत असल्याची चर्चा आहे. मात्र काही नेटकऱ्यांच्या मते त्यानं केलेलं हे लग्न खोटं आहे. व्हिडीओ तयार करण्यासाठी त्यानं हे नाटक केल्याचे आरोप केले जात आहेत. अखेर राजानं एका व्हिडीओच्या माध्यमातून या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं.
सोशल मीडियावर Raja vlogs सध्या चर्चेत असून, खूप प्रसिद्धी मिळवत आहे. खासकरुन इंस्टाग्राम आणि युट्बूयवर फार व्हायरल झालं आहे. हा राजा व्लॉगर युपीचा असून तो त्याच्या घरातच व्हिडीओ शूट करुन शेअर करत असतो. दरम्यान ज्याने ही रील शूट केली आहे, त्याचं नाव राजा असून, त्याचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर त्याच्या महिन्याच्या कमाईचा आकडा लाखोंमध्ये आहे.युट्यूबवर त्याचे तब्बल १० कोटी ४२ लाख मिलियन फॉलोअर्स आहेत. याशिवाय इंस्टाग्रामलाही त्याचे प्रचंड फॉलोअर्स आहेत.दरम्यान चला पाहुयात त्यानं त्याच्या लग्नबाबत काय खुलासा केलाय… तो म्हणाला, “माझं लग्न खोटं नाहिये. मी खरंखुरं लग्न केलं आहे. मी एक युट्यूबर आहे. त्यामुळे लग्नाचे व्हिडीओ काढून ते शेअर केले.” शिवाय तो बिहारचा आहे. अन् त्यांच्या इथे बायकोच्या भांगेत लाल ऐवजी गुलाबी कुंकू भरतात. त्यामुळे त्याची बायको गुलाबी कुंकू लावते. त्याचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “भाषेचा माज नाही आदर असावा तेव्हा ती समृद्ध होते”; हास्यजत्रेमधील व्हायरल VIDEO एकदा पाहाच
इतके फॉलोअर्स असल्याने राजा कुमारची कमाई कितकी असेल याचा तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल.राजा व्लॉग्स इंस्टाग्राम आणि युट्यूबवरुन प्रायोजकत्व यासह दरमहा सुमारे १० ते २५ लाख रुपये कमावतो. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायची झाल्यास ती ४ ते ५ कोटींच्या दरम्यान आहे.